शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! परप्रांतियाचे सफाई कामगारावर चाकूने ३३ वार; मृतदेह पाहून पत्नीनेही संपवली जीवनयात्रा

By सदानंद नाईक | Updated: March 9, 2026 19:06 IST

उल्हासनगरात हादरवून टाकणारी घटना घडली असून कंत्राटी सफाई कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आली

Ulhasnagar Crime: उल्हासनगर शहरात सोमवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. कोणार्क कंपनीच्या एका सफाई कामगाराची नशेखोर परप्रांतीय तरुणाने चाकूने सपासप वार करून हत्या केली. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या दुहेरी मृत्यूमुळे ३ आणि ४ वर्षांची दोन निष्पाप मुले अनाथ झाली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगर महापालिकेने शहराच्या स्वच्छतेचा ठेका कोणार्क इन्व्हायरो कंपनीला दिला आहे. या कंपनीत कार्यरत असलेले सफाई कामगार महादू जगताप हे सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कॅम्प नंबर ३ मधील बॅरेक क्र. ८९६ परिसरात कर्तव्यावर होते. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून दुर्गेशकुमार गुप्ता या नशेखोर परप्रांतीय तरुणाने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. आरोपीने जगताप यांच्यावर ३३ पेक्षा जास्त वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. महादू जगताप हे पत्नी पूर्वी आणि दोन लहान मुलांसह शहाड गावठाण परिसरात राहत होते. पतीच्या हत्येची बातमी समजताच पत्नी पूर्वी यांनी रुग्णालयात धाव घेतली. पतीचा छिन्नविछिन्न मृतदेह पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.

शहाड गावठाण येथील घरी परतल्यानंतर मृत जगताप यांची पत्नी पूर्वी हिने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. काही तासांच्या अंतराने आई-वडील दोघांचेही छत्र हरपल्याने त्यांच्या दोन लहान मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. या घटनेचे पडसाद सफाई कामगारांमध्ये उमटले आहेत. कामगार संघटनेचे नेते संदीप गायकवाड यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आक्रमक पवित्रा घेत कामबंद सुरू केले. जोपर्यंत जगताप कुटुंबाला योग्य न्याय आणि आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत शहरातील सफाईचे काम बंद ठेवण्याचा इशारा कामगारनेते संदीप गायकवाड यांनी दिला आहे. स्थानिक नेत्यांनी आणि कामगारांनी मयत जगताप यांच्या घरी धाव घेत माहिती घेतली.

पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी दुर्गेशकुमार गुप्ता याला तात्काळ अटक केली आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: Savagery! Migrant stabs cleaner; wife ends life after.

Web Summary : In Ulhasnagar, a cleaner was brutally stabbed to death by a migrant. Overwhelmed by grief, his wife committed suicide. Two young children are now orphaned, prompting outrage and a strike by sanitation workers demanding justice and compensation.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस