शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कुणी पाणी देतं का पाणी... माजी उपमहापौरांनाच भरावं लागतंय टँकरनं पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:29 IST

शहरातील लोकप्रतिनिधींचीच अवस्था अशी असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावं?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन एकमेकांकडे बोटं दाखवत असून आंदोलन आणि मोर्चे काढून नागरिकही हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देशहरातील लोकप्रतिनिधींचीच अवस्था अशी असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावं?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन एकमेकांकडे बोटं दाखवत असून आंदोलन आणि मोर्चे काढून नागरिकही हैराण झाले आहेत

ठाणे - कल्याण-डोंबिवली शहरानजीक असलेल्या 27 गावांत पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. काही दिवसांपूर्वी नगरसेविका सुनीता पाटील यांनी पाणी  टंचाईवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सध्या या भागात टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही आपल्या घरात टँकरने पाणी  आणावं लागतंय. भोईर यांचा टँकरने पाणी भरतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

शहरातील लोकप्रतिनिधींचीच अवस्था अशी असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावं?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासन एकमेकांकडे बोटं दाखवत असून आंदोलन आणि मोर्चे काढून नागरिकही हैराण झाले आहेत. कोरोना काळात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून या परिसरातील लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत. लोकप्रतिनिधीनाच टॅंकरने पाणी विकत घ्यावं लागतंय, अशी बिकटं अवस्था ग्रामीण परिसरात उदभवलीय. त्यामुळे, कुणी पाणी देतं का पाणी... असं म्हणायची वेळ नागरिकांसह नेतेमंडळींवरही आली आहे. 

दरम्यान, सामान्य नागरिक वारंवार पाणी विकत घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोरोना संकटामुळे अगोदरच नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असून पाण्यासाठी लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे, नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणी