शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील घडामोडीवरून ठाकरे बंधूमध्ये विसंवाद; निवडणूक होताच वेगळ्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:23 IST

ठाकरे बंधूंची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीसाठीच्या युतीची घोषणा केली. शिंदेसेनेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोकाचा प्रचार केला. मात्र, कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेनेच्या दोन नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला. तर, कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेला राज यांच्या मनसेने जाहीर पाठिंबा दिला. यामुळे ठाकरे बंधूंची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडणुकीच्या आधी एकत्रितपणे रणनीती निश्चित करणारे ठाकरे बंधूंची  निकालानंतरच्या परिस्थितीमध्ये काय करायचे याबाबत दोघांमध्ये चर्चा झालेली नव्हती का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच, अमरावती आणि अकोला येथे उद्धवसेनेचे नगरसेवक भाजपसोबत जात असल्याचे दिसत आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या या राजकीय घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले. राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही मिळाले नाही तर सोडून जातो, अशा मानसिकतेत काही जण आहेत. पण, प्रत्येकाला काही देऊ शकत नाही, ही त्यांची भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले.

पक्षाच्या मूळ धोरणाविरोधात कोणत्याही पक्षाचे स्थानिक नेतृत्व विपरित भूमिका घेत असल्यास पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे.  आमच्यासाठी शिंदे हे एमआयएम आहेत. त्यांच्याशी राजकीय किंवा कोणतेही अन्य संबंध ठेवायचे नाहीत. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत.-खा. संजय राऊत, नेते उद्धवसेना

महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आल्याच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच कल्याण-डोंबिवलीत मनसेने उद्धवसेनेची साथ सोडली.  उद्धवसेनेच्या नगरसेवकांनीही ‘जय महाराष्ट्र’ केला. पत्त्यातील बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो.-केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते प्रदेश भाजप

जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी जो निर्णय योग्य वाटला तो राजू पाटील यांनी घेतला आहे. चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. तो त्यांनी स्थानिक निर्णय घेतला, तसा आम्ही इथे घेतला. आमच्याविरोधात ८ उमेदवार उद्धवसेनेचे होते.-संदीप देशपांडे, मनसे नेते

English
हिंदी सारांश
Web Title : Discord in Thackeray Brothers' Alliance After Kalyan-Dombivli Election

Web Summary : Thackeray brothers' alliance faces strain as MNS supported Shinde's Sena in Kalyan-Dombivli post-election. Uddhav Sena corporators joining BJP in Amravati-Akola adds to the discord. Sanjay Raut downplays the issue, indicating internal dissent within Uddhav Sena over local decisions.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे