शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Updates News: कोरोनाच्या अटकावासाठी रेल्वे, बसस्थानकामध्ये होतेय चाचणी; KDMC सतर्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:12 IST

केडीएमसी सीमेवर नाही उपाययोजना : कल्याण-डोंबिवलीत कसा रोखणार कोरोना? केंद्र सुरू करण्याची केली जात आहे मागणी

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या साथीने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १५ दिवसांपासून चढ्या क्रमाने वाढत आहे. दिवसाला ७०० रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. महापालिकेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो कोविड सेंटर आणि रुग्णालये उभारली आहेत. मात्र, परप्रांत आणि गावाकडून येणाऱ्या रेल्वे गाड्या आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी महापालिका हद्दीत रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर कोरोनाची चाचणी केले जात आहे. मात्र, महापालिकेच्या सीमेवरच कोरोना रोखण्यासाठी कुठेही चाचणी केंद्रे दिसून येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने तेथे अशी केंद्रे सुरू करून कोरोना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

वाढत्या संसर्गावर उपाययोजना काय?कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील फेरीवाले, दुकानदार, तेथे काम करणारे कर्मचारी यांच्या अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनवर चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या चाचणीचे प्रमाण वाढविले जात आहे. परगाव आणि परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यांचा नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आदी माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेतली जात आहे.

कल्याण एसटी बसस्थानककल्याण एसटी बस स्थानकातून दररोज ७० फेऱ्या चालविल्या जातात. त्यात शहरांतर्गत बसशिवाय नाशिक, धुळे, नगर, पुणे, कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, अलिबाग, रत्नागिरी, चिपळूण आदी ठिकाणी बस सोडण्यात येतात. या परगावातून महापालिका हद्दीत येणाऱ्या प्रवाशांकरिता बस स्थानकात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. तेथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत चाचणी केली जाते. मात्र बस स्थानकात रात्रंदिवस बस येत असतात. त्यामुळे दुपारी १ नंतर आलेल्या प्रवाशांची चाचणीच होत नाही. त्यात एखाद्याला लागण झालेली असल्यास इतरांनाही त्याची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव महापालिका हद्दीत होण्याची दाट शक्यता आहे.

महापालिका हद्दीत कोरोनो रोखण्यासाठी जम्बो कोविड रुग्णालये आहेत. सध्या चाचणीचे प्रमाण वाढवले असून, ते दुप्पट केले जाणार आहे. रेल्वे व बसस्थानकावर चाचणी केले जात आहे. सगळी माहिती गोळा केली जात आहे. महापालिकेच्या सीमेवरील एंट्री पॉइंटवर चाचणी केंद्र नाही. मात्र त्याचाही विचार यापुढे करून त्या प्रकारचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल.-डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.

कल्याण रेल्वेस्थानककल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकात तीन शिफ्टमध्ये कोरोना चाचणी केले जाते. एका शिफ्टमध्ये २०० जणांची चाचणी केली जाते. तीन शिफ्टमध्ये किमान ६०० जणांची चाचणी केली जाते. प्रत्यक्षात परगावाहून महापालिका हद्दीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि होत असलेल्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात हजारो प्रवासी चाचणीच्या प्रक्रियेतून सुटत आहेत. त्यांची चाचणीच होत नाही.

केडीएमसीच्या सीमाकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीच्या बहुतांश सीमा आहेत. त्यात अनेक एंट्री पॉइंट आहे. मनपा हद्दीत उल्हासनगरातून वालधुनी येथे प्रवेश केला जातो. कल्याण-भिंवडी मार्गाने दुर्गाडी येथे प्रवेश केला जातो. तर, कल्याण-मुरबाड रस्त्यावरून शहाड येथे प्रवेश केला जातो. कल्याण-शीळ रस्त्यावरून शीळ येथे प्रवेश केला जातो. कल्याण-पनवेल येथून तळोजा खोणी येथे प्रवेश केला जातो. या एंट्री पॉइंटवर कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका