शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दत्तनगर चौकामधील ‘ते’ बांधकाम 22 तासांत तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:30 IST

रात्रभर सुरू होते पाडकाम : विकासकासह साथीदारांवर गुन्हा दाखल

डोंबिवली : महापालिकेच्या डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगर चौकात सरकारी आरक्षित जागेवर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम २२ तासाच्या अखंड कारवाईअंती शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अखेर जमिनदोस्त करण्यात आले. या दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या विकासकासह त्याच्या साथीदारांवर महापालिकेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.हे बांधकाम अनधिकृत घोषित केल्याने ते सात दिवसांत स्वखर्चाने काढून घेणेबाबत यापूर्वीच बांधकामधारक प्रफुल्ल गोरे यास नोटीस बजावली होती, परंतु, त्यांनी ते न पाडल्यामुळे गुरुवारी विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, सहा. आयुक्त (अनधिकृत बांधकाम) सुहास गुप्ते, क प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे, फ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, ड प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांच्या समक्ष उपस्थितीत ही निष्कासनाची कारवाई सुरू केली होती. ती सुरू असतानाच अनधिकृत बांधकाम धारक प्रफुल्ल गोरे व त्यांच्या समवेत असलेल्या जमावाने कारवाईस विरोध करून कारवाईसाठी आणलेल्या ३ ब्रेकर,जेसीबी मधली हवा काढून टाकली. पोकलेन यंत्र कारवाईच्या ठिकाणी पोहोचण्यामध्ये घरडा सर्कल येथे गुंड पाठवून अडथळा करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या कारवाईस अडथळा निर्माण केल्यामुळे ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी बांधकामधारक प्रफुल्ल गोरे व अन्य काही जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली.महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी एखादी मिळकत खरेदी करतांना महापालिकेकडून सदर मिळकतीबाबत खातरजमा करूनच ती खरेदी करून होणारे संभाव्य नुकसान टाळावे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केडीएमसीने केले आहे.