विश्वनाथ भोईर हे खरे लोकप्रतिनिधी, त्यांचे अभिनंदन; राजू पाटील असं का म्हणाले?, पाहा

By मुरलीधर भवार | Published: October 18, 2023 04:52 PM2023-10-18T16:52:29+5:302023-10-18T16:52:50+5:30

आमदारांनी दुर्गाडी ते पत्रीपूलाच्या दरम्यान रस्त्यावरील खड्डे भरण्याची सूचना केली.

Congratulations to Vishwanath Bhoir, a true representative of the people; Why did MNS MLA Raju Patil say that?, lets know | विश्वनाथ भोईर हे खरे लोकप्रतिनिधी, त्यांचे अभिनंदन; राजू पाटील असं का म्हणाले?, पाहा

विश्वनाथ भोईर हे खरे लोकप्रतिनिधी, त्यांचे अभिनंदन; राजू पाटील असं का म्हणाले?, पाहा

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर एव्हढे अधिकारी आले आहेत. मात्र शहरातील रस्त्यावर खड्डे, वाहतूक कोंडीचा प्रश्न, कचरा उचलला जात नाही. या विविध समस्या सुटत नाहीत. हे जेव्हा माझ्या सहनशक्तीच्या पलिककडे होईल, तेव्हा मला काय करायचे ते मी करणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
आमदार भोईर यांच्या या विधानानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आमदार भोईर सारखे लाेकप्रतिनिधी सत्तेत असूनही देखील खरे बोलतात. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. ते खरे लाेकप्रतिनिधी आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध समस्याबाबत केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणची घेटे सोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार भोईर यांनी काल बैठक घेतली. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जे काय करावे लागेल ते करा असे अधिकाऱ्यांना बजावले. आमदारांनी दुर्गाडी ते पत्रीपूलाच्या दरम्यान रस्त्यावरील खड्डे भरण्याची सूचना केली. हे रस्ते कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतात. ते न पाहता महापालिकेने खड्डे बुजविले पाहिजेत. वारंवार आयुक्तांना सांगून देखील कामे का होत नाहीत असा प्रश्न आमदारांना विचारला असता त्यांनी सांगितले की, प्रतिनियुक्तीवर बरेच अधिकारी आलेले आहे. स्टाफ सर्व भरलेला आहे. तरी देखील कामे होताना दिसून येत नाही. कल्याणच्या पब्लीकला याचे कोडे पडले आहे. तसेच मलाही कोडे पडले आहे. हे कोडे आपल्याला सोडवायचे आहे. एव्हढे अधिकारी असताना कल्याणमध्ये कुठे तरी बकालपणा सुरु आहे.

रस्ते, स्वच्छता या सोयी सुविधा नागरीकांना का देऊ शकत नाही. ज्या वेळेस माझ्यापण सहनशक्तीच्या पलिकडे होईल त्यावेळी मी काय करायचे आहे ते करणार. याबाबत आमदार पाटील यांनी सांगितले की, भोईर यांच्या मताशी मी सहमत आहे. एका बाबतीत मी त्याचे अभिनंदन करेन. सत्तेधारी पक्षात असाता देखील त्यांनी ही व्यथा मांडली. जे खरे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी असे स्पष्टच बोलायला पाहिजे. वरवरची विकास कामे तुम्हाला दिसतात. ती लाेकांपर्यंत पोहचलेली नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे. चांगली कामे काय आहे या शहरात तुम्ही दाखवा. खड्डे, रस्ते,ट्राफिकचा बोजवारा, भ्रष्टाचार चांग्लया गोष्टी आहेत कुठे जोपर्यंत ही लोक ठाण मांडून बसली आहेत. तोपर्यंत हे असे चालणार.

Web Title: Congratulations to Vishwanath Bhoir, a true representative of the people; Why did MNS MLA Raju Patil say that?, lets know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.