शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका

By मुरलीधर भवार | Updated: April 30, 2024 16:08 IST

युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला.

कल्याण : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेऊन ठेवले आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे बोलतो. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचेच बोललो नाही तर भाजप महाराष्ट्राचे मंत्रालय गुजरातला नेऊन ठेवतील अशी टिका उद्ववसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला. या प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत युवा नेते ठाकरे सहभागी झाले होते. या प्रसंगी त्यांनी उपरोक्त टिका केली. कल्याण लोकसभेतून आम्ही सर्व सामान्य उमेदवार दिला आहे. वैशाली दरेकर यांचे काम सगळयांनाच माहिती आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी जनता रस्त्यावर आली आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

आमची लढाई अपक्षांसोबत - वरुण सरदेसाईकल्याण लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला जात आहे. यावर उद्धव सेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, महायुतीने या मतदार संघातून खासदार शिंदे यांची उमेदवारीच घोषित केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची लढाईही अपक्षांसोबत आहे, असे वक्तव्य करुन खासदार शिंदे यांना चिमटा काढला आहे. सामान्य महिला कार्यकर्ता वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने जनता त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आहे.

भटकती आत्माची ताकद काय आहे, हे त्यांना आता कळेल - जितेंद्र आव्हाडमोदी हे स्वत: घाबरल्यासारखे आहेत. त्यांनी काल जे भाषण केले. त्यात त्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटले आहे. इतक्या खालच्या दर्जाचे भाषण आजपर्यंत कोणाचेही झाले नव्हते. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याला भटकती आत्मा म्हणतात. या प्रकारची टीका करणे म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करीत मोदी यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. भटकती आत्म्याची ताकद काय आहे. हे निवडणूकीच्या निकालानंतर कळणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyan-pcकल्याणAaditya Thackerayआदित्य ठाकरेkalyanकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४