"स्नॅपचॅट वापरु नको"; वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने डोबिंवलीत मुलीने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:06 PM2024-06-24T14:06:30+5:302024-06-24T14:11:09+5:30

मोबाईलच्या वापराबाबत वडिलांनी दिलेला सल्ला न पटल्याने १६ वर्षीय मुलीने आपलं आयुष्य संपवलं.

16 year Girl end his life in Dombivli after father opposes her to download Snapchat | "स्नॅपचॅट वापरु नको"; वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने डोबिंवलीत मुलीने संपवलं आयुष्य

"स्नॅपचॅट वापरु नको"; वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने डोबिंवलीत मुलीने संपवलं आयुष्य

Dombivli Crime : आजकाल तरुणांपासून जेष्ठापर्यंत अनेकजण हे मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या नादात अनेकजण असं काही पाऊल उचलतात ज्याचा कधी कोणीही विचार केला नसेल. असाच काहीसा प्रकार डोबिंवलीत घडला. सोशल मीडियाच्या वापरावरुन वडील ओरडल्याने एका अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने डोबिंवलीत खळबळ उडाली आहे.

वडिलांनी मोबाईल फोनवर मेसेजिंग ॲप डाउनलोड करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने डोबिंवलीत १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती वडिलांनीच दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वडील ओरडल्याने राग अनावर झाल्याने मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

स्नॅपचॅटच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने वडिलांना मुलीला ते ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करु नको असे सांगितले होते. त्यानंतरही वडिलांचे न ऐकता मुलीने मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ॲप डाउनलोड केले. वडिलांना ही गोष्ट कळताच त्यांनी नाराजी दर्शवली आणि मुलीला असे पुन्हा करु नको असे सांगितले. वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने मुलीने बेडरुममध्ये रात्रीच्या दरम्यान ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर मृत मुलीच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याची तक्रार दिली.
 
मुलीने कथितरित्या रात्री तिच्या बेडरूमच्या छताला गळफास लावून घेतल्याचे म्हणत दुसऱ्या दिवशी कुटुंबाला तिचा मृत्यू झाल्याचे कळल्याचे म्हटलं.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अपघाती मृत्यूची नोंद केली.

कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी

दुसऱ्या एका घटनेत डोबिंवलीत कौटुंबिक वादातून महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला.  प्रीती उमा भारती असे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. इमारतीवरुन उडी मारल्याने महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: 16 year Girl end his life in Dombivli after father opposes her to download Snapchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.