PKL 2019 : गौतम गंभीरचा 'ले पंगा'; कबड्डीच्या मैदानावर केली चढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 12:51 IST2019-07-25T12:46:03+5:302019-07-25T12:51:25+5:30
क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरला बुधवारी यूपी योद्धा संघाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले आहे.

PKL 2019 : गौतम गंभीरचा 'ले पंगा'; कबड्डीच्या मैदानावर केली चढाई
मुंबई: क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरला बुधवारी यूपी योद्धा संघाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले आहे. यूपी योद्धाच्या टीमने एक प्रोमो प्रर्दशित केला त्यामध्ये गौतम गंभीर ब्रँड अँबेसेडर असल्याचे दिसून आले.
यूपी योद्धाने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच या ट्विटमध्ये म्हटले आहे की सर्व उत्तर प्रदेशची आन, बान आणि शान, भारताचा आवडता) गौतम गंभीर आणि यूपी योद्धा घेऊन येत आहे तूफान.’
क्योंकि अपनी Line लम्बी करने के लिए दुश्मन की Line पार करनी ही पड़ती है!!! Proud to be the Brand Ambassador of @UpYoddha#SaansRokSeenaThok#YoddhaHum#UPvKOL@ProKabaddi@StarSportsIndiapic.twitter.com/06tVoFgTE4
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 24, 2019
याबरोबरच गौतम गंभीरनेही ट्विट करत म्हटले आहे की ‘यूपी योद्धाचा ब्रँड अँबेसिडर झाल्याबद्दल अभिमान वाटतो.’
गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर थेट राजकारणात उडी घेतली होती. तो भाजपाच्या तिकीटावर विजयी होऊन पूर्व दिल्लीचा खासदार झाला. त्यानंतर आता त्याने यूपी योद्धाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून कबड्डीमध्येही प्रवेश केला आहे.
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रात बुधवारी विजयी सलामी देताना आक्रमक खेळ केलेल्या बेंगाल वॉरियर्सने यूपी योद्धाचा ४८-१७ असा धुव्वा उडवला.