बापरे! १० वर्षांपासून दारू प्यायचा; घास गिळायला त्रास झाल्यानंतर एक्स रे पाहून डॉक्टर चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:27 PM2021-02-03T18:27:03+5:302021-02-03T18:53:10+5:30

Trending Viral News in Marathi : एका ३२ वर्षांच्या तरूणांच्या गळ्यातून फुफ्फुसांमध्ये अडकलेला  १४ सेंटीमीटरचा चाकू काढला आहे.  विशेष म्हणजे या तरूणानं चाकूसह पेनाची रिफीलसुद्धा गिळली होती.

Young man swallowed knife doctors barely saved life in bhopal | बापरे! १० वर्षांपासून दारू प्यायचा; घास गिळायला त्रास झाल्यानंतर एक्स रे पाहून डॉक्टर चक्रावले

बापरे! १० वर्षांपासून दारू प्यायचा; घास गिळायला त्रास झाल्यानंतर एक्स रे पाहून डॉक्टर चक्रावले

Next

जगभरात खाण्याचे शौकीन असलेले अनेक लोक तुम्हाला पाहायला मिळतील. खाण्यापिण्याची हीच सवय एका तरूणाला चांगलीच महागात पडली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळच्या रहिवासी असलेल्या एम्सच्या डॉक्टरांनी  एका ३२ वर्षांच्या तरूणांच्या गळ्यातून फुफ्फुसांमध्ये अडकलेला  १४ सेंटीमीटरचा चाकू काढला आहे.  विशेष म्हणजे या तरूणानं चाकूसह पेनाची रिफीलसुद्धा गिळली होती.

मध्यप्रदेशच्या छतरपूरमधील रहिवासी असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाच्या पोटातून याआधीही लोखंडाच्या वस्तू काढण्यात आल्या होत्या.  २ वर्षांपूर्वी ऑपरेशन करून या तरूणाच्या शरीरातील अजब गोष्टी काढून टाकल्या होत्या. आता सर्जरीनंतर जखम पूर्णपणे बरी होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यानंतर अजून एक सर्जरी करावी लागणार आहे. 

या तरूणाला घास गिळण्यात खूप त्रास व्हायचा.  घश्यात तीव्रतेने वेदना होत असल्यामुळे खाणं पिणं कमी  केलं होतं. ईएनटी विभाग सर्जन्सनी तपासणीनंतर या तरूणांशी बातचीत केली.  यावेळी तरूणानं दिलेल्या माहितीनुसार खाण्याच्या नादात चुकून या तरूणानं चाकू गिळला.  हा तरूण दोन वर्षांपासून सायकोटीनक औषध घेत होतो याव्यतिरिक्त  १० वर्षांपासून दारू, बीडी, गुटखा आणि तंबाखू खाण्याची सवय त्याला होती.

चाकू निगल गया युवक

डॉक्टरांनी जेव्हा या माणसाच्या घश्याचा आणि फुफ्फुसांचा एक्सरे काढला तेव्हा ते हैराण झाले. कारण त्यावेळी नलिकेतून चाकू शिरला होता. एंडोस्कोपीमधून समोर आलं की या माणसानं चाकू व्यतिरिक्त पेनाची रिफीलसुद्धा गिळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी लगेचच सर्जरी करायचं ठरवलं. तब्बल ११ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला तरूण; कोरोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं, अन् मग....

भोपाळच्या एम्समधील तज्ज्ञ डॉ. रमण सिंह यांनी आजतकशी बोलताना सांगितले की, ''हे ऑपरेशन खूप कठीण होते. कारण जवळपास  १४ सेमीचा चाकू होता.  याशिवाय मेंदूला नुकसान पोहोचण्याची शक्यतासुद्धा होती. याव्यतिरिक्त चाकूचा  टोकदार भाग या तरूणाच्या हृदयाच्या धमन्यांपर्यंत पोहोचला होता. ही सर्जरी पूर्ण  करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. '' काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती

Web Title: Young man swallowed knife doctors barely saved life in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.