तब्बल ११ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला तरूण; कोरोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं, अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:34 PM2021-02-03T15:34:30+5:302021-02-03T15:42:20+5:30

 हा तरूण शुद्धीवर आल्यानंतर त्याला कोरोनाच्या स्थितीबाबत खरं कसं सांगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न घरच्यांसमोर होता.

A student in england got injured in accident and went to coma before corona lockdown and now he is back | तब्बल ११ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला तरूण; कोरोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं, अन् मग....

तब्बल ११ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला तरूण; कोरोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं, अन् मग....

Next

२०२० मध्ये कोरोना व्हायरसच्या माहामारीनं लोकांच्या शरीरालाच नुकसान पोहोचलेलं नाही तर या व्हायरसमुळे मानसिक स्थितीवरही परिणाम झालेला दिसून आला. लॉकडाऊनच्या काळात सतत घरी राहिल्यामुळे लोकांना गंभीर मानसिक समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेकांना आपल्या आयुष्यातून  २०२० डिलीट करून टाकावं असं वाटलं. पण या माहाारीदरम्यान एक तरूण  कोमात होता म्हणून त्यानं कोरोनाकाळातील जग पाहिलेलं नाही.  हा तरूण शुद्धीवर आल्यानंतर त्याला कोरोनाच्या स्थितीबाबत खरं कसं सांगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न घरच्यांसमोर होता.

इंग्लंडचा रहिवासी असलेला १९ वर्षीय जोसेफ फ्लेविलचा मार्च महिन्यात अपघात झाला होता. त्यावेळी हा तरूण बर्टन रस्त्यावर फिरत होता. मागून कारनं धडक दिल्यामुळे हा तरूण पूर्णपणे जखमी झाला. जोसेफच्या डोक्याला मार लागल्यामुळे कोरोनाची माहीमारी येण्याच्या काही दिवस आधी हा तरूण कोमात गेला. काय सांगता? १८० वर्ष जगण्यासाठी हा माणूस करतोय भलताच जुगाड; आतापर्यंत खर्च केले इतके पैसै

प्रतीकात्मक तस्वीर

२३ मार्चला झालेल्या लॉकडाऊनच्या तीन आठवड्याआधीच जोसेफ कोमात गेला होता.  जोसेफ पुन्हा कोरोना पॉझिजिव्ह झाला अूसन दोनवेळा बरा सुद्धा झाला. अलिकडेच तो कोमातून बाहेर आला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसने बदलेल्या जगाबाबत त्याला कोणतीही कल्पना नाही.

काय सांगता? ८ वर्षात ११६ मुलांचा पिता बनला; फेसबुकवर महिला करताहेत आई बनण्यासाठी विनंती

कोरोना व्हायरसच्या  गाईडलाईन्समुळे जोसेफजवळ फक्त त्याच्या आईला थांबण्याची परवानगी होती.  जोसेफच्या नातेवाईक असलेल्या सैली स्मिथ यांनी स्टेफोर्डशायर लाईव्हशी बोलताना सांगितले की, ''कोरोनाबाबत हा किती जागरूक असले याबाबत आम्हाला कल्पना नाही.  या माहामारीदरम्यान तो कोमात होता. त्यामुळे आज आव्हानात्मक स्थितीला तोंड द्यावे लाग आहे.'' 

Web Title: A student in england got injured in accident and went to coma before corona lockdown and now he is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.