घरी जास्त महिला जेवण बनवतात की पुरूष? सर्वेमधून हैराण करणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:31 AM2023-11-07T11:31:33+5:302023-11-07T11:32:06+5:30

हा सर्वे या गोष्टीवर लक्ष ठेवतो की, जगभरातील देशांमध्ये लोक किती वेळा घरी जेवण बनवतात आणि खातात.

Women or men who cook more at home surprising figures in the survey | घरी जास्त महिला जेवण बनवतात की पुरूष? सर्वेमधून हैराण करणारा खुलासा

घरी जास्त महिला जेवण बनवतात की पुरूष? सर्वेमधून हैराण करणारा खुलासा

जगभरात सतत वेगवेगळे सर्वे होत असतात. ज्यातून वेगवेगळी माहिती समोर येत असते. आता एका नव्या सर्वेमधून समोर आलं आहे की, घरी जेवण बनवण्यात जेंडर गॅप वाढला आहे. जगभरातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये महिला पुरूषांच्या तुलनेत अधिक जेवण बनवतात. 2022 मध्ये महिलांनी दर आठवड्याला सरासरी 9 वेळा जेवण बनवलं तर पुरूषांनी दर आठवड्याला जवळपास 4 वेळा जेवण बनवलं. मीडिया रिपोट्सनुसार, गॅलप आणि कुकपॅडच्या वार्षिक सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे.

हा सर्वे या गोष्टीवर लक्ष ठेवतो की, जगभरातील देशांमध्ये लोक किती वेळा घरी जेवण बनवतात आणि खातात.

कधी झाली याची सुरूवात

हा सर्वे 2018 मध्ये सुरू झाला होता. महामारी दरम्यान या सर्वेच्या रिझल्टमधून समजलं की, या काळात पुरूषांनी अधिक जेवण बनवलं. 

गॅलपचे शोध निर्देशक एंड्रयू डुगन सांगतात की, जेव्हा हा सर्वे सुरू झाला, दरवर्षी जेंडर गॅप कमी होत गेला. 

पुरूषांनी जेवण बनवणं कमी केलं

सर्वेच्या लेटस्ट रिझल्टमध्ये जेवण बनवण्याचा हा ट्रेंड बदलला आहे. 2022 मध्ये महिलांनी आधीसारखं जेवण बनवणं कायम ठेवलं. पण पुरूषांनी जेवण बवनणं कमी केलं.

डुगन सांगतात की, हे पहिलं वर्ष आहे जेव्हा अंतर मुळात वाढलं आहे. ते असंही म्हणाले की, हे अंतर 2018 च्या आपल्या सुरूवातीच्या बिंदुवर परत आलं आहे.

वेगवेगळ्या देशात वेगवेगळं चित्र

जेंडर गॅप देशांनुसार, वेगवेगळा आढळून येतो. अमेरिकेत महिला पुरूषांच्या तुलनेत दर आठवड्याला सरासरी दोन वेळा अधिक जेवण बनवतात.

सर्वेनुसार, इथिओपिया, तजाकिस्तान, इजिप्त, नेपाळ आणि यमन सगळ्यात जास्त जेंडर गॅप असलेले देश आहेत. इथे महिला पुरूषांच्या तुलनेत दर आठवड्याला जवळपास 8 वेळा जेवण बनवतात. जेवण बनवण्यात  सगळ्यात कमी जेंडर गॅस असलेल्या देशांमध्ये स्पेन, यूके, फ्रांस आणि आयरलॅड यांचा समावेश आहे.

केवळ एका देशात पुरूष जास्त वेळ बनवतात जेवण

सर्वेनुसार पूर्ण जगभरात केवळ इटली एक असा देश हे जिथे पुरूष महिलांच्या तुलनेत जास्त जेवण बनवतात. हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, इटलीमध्ये हा ट्रेंड काय बघायला मिळाला किंवा यूएससहीत इतर देशांमध्ये जेंडर गॅप का वाढला?

Web Title: Women or men who cook more at home surprising figures in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.