Women choose 6 feet tall sperm donor but boy born with dwarfism | बाळाच्या उंचीसाठी महिलेने ६ फूट उंच स्पर्म डोनरची केली निवड, पण आता तिच गेली कोर्टात!
बाळाच्या उंचीसाठी महिलेने ६ फूट उंच स्पर्म डोनरची केली निवड, पण आता तिच गेली कोर्टात!

आजकाल जवळपास सर्वच आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांचं बाळ हे बॉलिवूड कलाकारांसारखं यशाच्या शिखरावर असावं. त्यांनी खूप पैसा आणि नाव कमवावं. त्यांनी सेलिब्रिटीसारखं सुंदर दिसावं. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक नको नको ते करतात. अशीच एक अजब घटना रशियात समोर आली आहे.

येथील एका ४० वर्षीय महिला IBF टेक्निकच्या मदतीने आई झाली. यादरम्यान तिने स्पर्म बॅंकेच्या मदतीने आपल्या होणाऱ्या बाळासाठी ६ फूट उंच स्पर्म डोनरची निवड केली. महिलेचं वय ४० वर्षे झालं होतं, त्यामुळे तिला वाटत होतं की, गर्भवती होण्याची ही शेवटची संधी आहे. 

त्यामुळे तिला वाटत होतं की, तिचं बाळ हे सर्वगुण संपन्न व्हावं.  महिलेने एका अशा स्पर्म डोनरची निवड केली, जो शिक्षित होता आणि त्याची उंची ६ फूट होती. पण तिला धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला कळालं की, तिचं बाळ हे कमी उंचीचं जन्माला येणार आहे. कारण डॉक्टरांना जन्माला येणाऱ्या बाळामध्ये जन्माला येण्याआधीच  'Achondroplasia' ची लक्षणे दिसली. 'Achondroplasia' ची लक्षणे असलेल्या बाळांमध्ये हाडांचा विकास होत नाही. सोबतच बाळांच्या डोक्याचा आकार मोठा तर बोटांचा आकार फार छोटा असतो.

महिलेने तरीही बाळाला जन्म दिला. पण डॉक्टरांनी महिलेला सांगितले की, या बाळाची उंची ४ फूटापेक्षा जास्त वाढणार नाही. सोबतच त्याच्या शरीराचे इतर अंगही व्यवस्थित विकसित होणार नाहीत. यानंतर महिलेने स्पर्म बॅंक विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल. 

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या तक्रारीनंतर रशियातील एका जिल्हा कोर्टात ही स्पर्म बॅंक बंद करण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर स्पर्म बॅंकने आपली भूमिका मांडली की, या प्रक्रियेदरम्यान आम्ही डोनरच्या ४६ जेनेटिक लक्षणांची टेस्ट करतो, त्यानंतर त्या व्यक्तीची निवड होते. आम्ही नेहमी एक्सीलेंट क्वालिटीचे स्पर्म डोनेट करतो. तर यावर मेडिकल एक्सपर्टचं मत आहे की, हे गरजेचं नाही की, स्पर्ममुळे बाळ असं कमी उंचीचं जन्माला आलं असेल. यासाठी आणखीही काही कारणे असू शकतात.


Web Title: Women choose 6 feet tall sperm donor but boy born with dwarfism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.