पत्नीने एक्स Ex-Girlfriend सोबत लावून दिलं पतीचं लग्न, आता एकाच छताखाली राहणार तिघेही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 11:45 IST2022-09-26T11:45:33+5:302022-09-26T11:45:47+5:30

पतीचं एक्स गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून देण्यासाठी महिलेनेच सगळी तयारी केली. सध्या सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली आहे.

Woman gets husband wedding with his ex-girlfriend in Tirupati | पत्नीने एक्स Ex-Girlfriend सोबत लावून दिलं पतीचं लग्न, आता एकाच छताखाली राहणार तिघेही..

पत्नीने एक्स Ex-Girlfriend सोबत लावून दिलं पतीचं लग्न, आता एकाच छताखाली राहणार तिघेही..

Marriage With Ex-Girlfriend: आंध्र प्रदेशच्या तिरूपतीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या पतीचं लग्न त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत लावून दिलं. आता त्यांनी असं ठरवलं की, ते तिघेही एकाच घराच राहणार. पतीचं एक्स गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून देण्यासाठी महिलेनेच सगळी तयारी केली. सध्या सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली आहे. चला जाणून घेऊ या लव्हस्टोरीबाबत...

टाइम्स नाऊमधील एका बातमीनुसार, पतीचं लग्न त्याच्या  गर्लफ्रेंडसोबत लावून देण्याची ही घटना तिरूपतीमधील डक्कलीच्या आंबेडकर नगरातील आहे. इथे विमला नावाच्या महिलेने आपला पती कल्याणचं लग्न त्याची  गर्लफ्रेंड नित्यासोबत लावून दिलं. कल्याण हा एक फेमस यूट्यूबर आहे. विमला आणि कल्याणची भेट काही वर्षाआधी झाली होती. आधी त्यांनी ओळख होती मग ते जवळ आले. नंतर कल्याण आणि विमलाने लग्न केलं.

दरम्यान लग्नाच्या काही वर्षानंतर विमलाला पती कल्याणच्या वागण्यात थोडा बदल जाणवला. कल्याणच्या आयुष्यात विशाखापट्टनमची नित्या नावाची तरूणी पुन्हा परत आली होती. काही वर्षाआधी कल्याण आणि नित्याचं नातं तुटलं होतं. त्यानंतर कल्याणने विमलासोबत लग्न केलं होतं. पण जेव्हा नित्याला कल्याणच्या लग्नाबाबत समजलं तेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, नित्याने हात जोडून विमलाकडे तिच्या पतीसोबत लग्न करण्याची परवानगी मागितली. कारण तिला कल्याण हवा होता. नित्या विमलाला हेही म्हणाली की, ते लग्नानंतर तिघेही एकाच घरात राहणार. थोडा वेळ घेऊन विमलाने नित्याची मागणी मान्य केली. त्यानंतर विमलाने पतीचं लग्न त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत लावून दिलं.

Web Title: Woman gets husband wedding with his ex-girlfriend in Tirupati