कमालच! फार पूर्वी चक्क सोनं वितळवून पित होते लोक, कारण वाचून चक्रावेल डोकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:01 IST2026-01-07T15:59:49+5:302026-01-07T16:01:06+5:30
Gold Drinking Facts : आयुष्य तरूण दिसण्याची किंवा आयुष्य वाढावं ही इच्छा काही आजची नाही. हजारो वर्षाआधीही लोकांना हेच वाटत होतं. यासाठी ते वेगवेगळे उपाय करत होते. त्यातीलच एक उपाय होता सोनं वितळवून पिणे.

कमालच! फार पूर्वी चक्क सोनं वितळवून पित होते लोक, कारण वाचून चक्रावेल डोकं
Gold Drinking Facts : अनेकांना असं वाटत असतं की, आपण आयुष्यभर तरूणच रहावं किंवा आपलं आयुष्य वाढावं. अशात आयुष्य वाढवण्यासाठी बरेच लोक इतके काय काय कारनामे करतात की, त्यांवर विश्वासही बसत नाही. म्हातारपण रोखण्यासाठी वेगवेगळे व्यायाम किंवा औषधं घेतली जातात. याबाबत अनेक प्रयोगही मोठ्या लेव्हलवर सुरू आहेत. पण आयुष्यभर तरूण दिसण्याची किंवा आयुष्य वाढावं ही इच्छा काही आजची नाही. हजारो वर्षाआधीही लोकांना हेच वाटत होतं. यासाठी ते वेगवेगळे उपाय करत होते. त्यातीलच एक उपाय होता सोनं वितळवून पिणे.
१६ शतकातील फ्रान्सच्या राज दरबारात महत्वाच्या पदावर असलेल्या डायने डी पोयटिअर्स नावाच्या राजाच्या प्रेयसीने काही खास लोकांना आणि दरबारातील दुसऱ्या अधिकाऱ्यांना सोनं थोड्या थोड्या प्रमाणात वितळवून पिण्यास प्रेरित केलं. त्यावेळच्या लोकांना वाटत होतं की, सोनं वितळवून ते प्यायल्यास म्हातारपण रोखण्यास मदत मिळते. हा प्रकार फारच प्रचलित होता.
प्राचीन चीन आणि इजिप्तमध्ये प्रथा
म्हातारपण रोखण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी सोनं पिण्याची प्रथा प्राचीन चीन आणि इजिप्तमध्ये होती. हिस्ट्री.कॉमनुसार, अमरत्व यावर पुस्तक लिहिणारे लेखक स्टीफन केव सांगतात की, रसायनशास्त्री पश्चिम आणि पूर्व दोन्ही ठिकाणी होते. ज्यांचं प्राथमिक लक्ष्य अमरत्वाचे उपायमध्ये बघायला मिळतात.
केव यांच्यानुसार, सोन्याला अविनाशी आणि सगळ्या धातुंमध्ये सगळ्यात शुद्ध मानलं जात होतं. त्यामुळे लोकांचं असं मत होतं की, अशा अविनाशी किंवा अमर पदार्थांचं थोड्या प्रमाणात सेवन केल्यानं लोक जास्त काळ जिवंत राहू शकतात.
इलिनोइस विश्वविद्यालयात महामारी विज्ञानाचे प्रोफेसर एस जे ओल्शांस्की सांगतात की, इ.स.पू. २५०० मध्ये चीनी रसायनशास्त्री वेई बोयांगने या सिद्धांताचा पुरस्कार केला होता की, अमर पदार्थांचं थोड्या प्रमाणात सेवन केल्यानं लोक जास्त काळ जगू शकतात.
त्यामुळे अनेक शासकांनी आपली संपत्ती वाढण्यासाठी भरपूर प्रमाणात सोनं खरेदी केलं आणि ते जमा केलं. त्यामुळे त्यावेळच्या संशोधकांकडे वितळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोनं उपलब्ध होतं.
राजाच्या प्रेयसीच्या केसांमध्ये सोनं
फ्रान्सचे राजा हेन्री द्वितीयची प्रेयसीचा मृत्यू ६६ वयात झाला होता. या वयापर्यंत तिने थोड्या थोड्या प्रमाणात भरपूर सोन्याचं सेवन केलं होतं. २००८ मध्ये जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या केसांमधील सोन्याचं प्रमाण सामान्यापेक्षा ५०० पटीने जास्त आढळलं होतं. इतकंच नाही तर तिच्या हाडांमध्ये पाऱ्याचा अंशही आढळला होता.