कधी विचार केलाय का?; जपमाळेत एकशे आठच मणी का असतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 04:05 PM2019-10-31T16:05:52+5:302019-10-31T16:09:57+5:30

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं.

Why malas have 108 beads or What is the Significance of 108? | कधी विचार केलाय का?; जपमाळेत एकशे आठच मणी का असतात?

कधी विचार केलाय का?; जपमाळेत एकशे आठच मणी का असतात?

googlenewsNext

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं. नामस्मरण करण्यासाठी विविध गोष्टींचा वापर करण्यात येतो. त्यापैकीच एक म्हणजे, जपाची माळ. देवाचं नामस्मरण करताना 108 मण्यांची जपमाळ वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? ही माळ फक्त 108 मण्यांचीच का असते? जाणून घेऊया जपमाळेत फक्त 108 मणीच का असतात त्याबाबत... 

जप पूर्ण होणं हे मंत्रजपाची संख्या आणि हवनातील आहुतीच्या संख्येवर अवलंबून असते. जपमाळ कोणतीही असो, त्यामध्ये 108 मणी असतात. अनेकदा आपण हे ऐकतो. पण कधी विचार केला नसेल. 

अनेक मोठे साधू संतही आपल्या नावापुढे श्री श्री 108 चा वापर करतात. त्रिदेवांची आराधना करतानाही 108 नावांचा जप करण्यात येतो. यामागे वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि ज्योतिषीय कारणं आहेत. जाणून घेऊया या कारणांबाबत सविस्तर... 

आपल्या कालगणनेमध्ये सूर्याला फार महत्त्व आहे. एका वर्षात सूर्य 12 राशींमध्ये फिरून 360 अंश पूर्ण करतो. याच 360 अंशांना 60 ने गुणल्यास 21600 कला पूर्ण होतात. या कला दोन आयनांमध्ये पडतात. पहिल्या सहा महिन्यांमध्ये सूर्याचे दक्षिणायन आणि पुढिल सहा महिन्यांमध्ये सूर्याचं उत्तरायन असते. एका आयनात 21 हजार 600च्या अर्धे म्हणजेच, 10 हजार 800 कला येतात. 

तसेच, सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापर्यंत 60 घडी होतात. एका घडीत 24 मिनिटं असून एका घडीत 60 पळ आणइ एका पळात 60 विपळ असतात. अर्थातच 24 तास किंवा 60 घडीत 60 गुणिले 60 गुणिले 60 म्हणजेच 21 हजार 600 विपळ असतात. अर्थात अर्ध्या दिवसात, 12 तासात 10 हजार 800 विपळ येतात. जर शेवटचे दोन शून्य सोडले तर वर्ष आणि दिवसाच्या सूर्य संचाराच्या एकूण संख्येत 108 उरतात.

Web Title: Why malas have 108 beads or What is the Significance of 108?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.