शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या समुद्रातून का काढलं जात नाही कच्चं तेल? जाणून घ्या असं करणं शक्य आहे का....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:03 IST

Crude Oil : लोकांना प्रश्न पडणं साहजिक आहे की, भारत स्वत: जमिनीखालून तेल का काढत नाही किंवा हिंद महासागरासारख्या समुद्रातून कच्चं तेल का काढत नाही?

Crude Oil : इराणविरोधातील युद्धामुळे जगावर कच्च्या तेलाचं मोठं संकट गिरक्या घेताना दिसतंय. अमेरिका आणि इस्त्राइलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील स्थिती फारच अस्थिर झालीये. सध्या जरी थेट हल्ले थांबले असतील, पण तणाव अजूनही कायम आहे. याचाच थेट परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर बघायला मिळतोय. होर्मुज सामुद्रधुनी कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी महत्वाचा रस्ता आहे. जो अजूनही पूर्णपणे खुला झालेला नाही. आपल्याला कल्पना आहेच की, भारत, चीन, जपानसारखे देश तेलासाठी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशांवर अवलंबून आहेत. पण होर्मुज सामुद्रधुनीचा पेच अजून सुटलेला नसल्याने या देशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. भारताला जितकं तेल लागतं, त्याच्या ८० ते ९० टक्के तेल हे दुसऱ्या देशातून आयात केलं जातं. अशात लोकांना प्रश्न पडणं साहजिक आहे की, भारत स्वत: जमिनीखालून तेल का काढत नाही किंवा हिंद महासागरासारख्या समुद्रातून कच्चं तेल का काढत नाही?

हिंद महासागरातून कच्चं तेल का काढत नाही?  

मुळात हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, सगळ्यात समुद्रातून तेल काढलं जाऊ शकत नाही. लाखो वर्षांआधी काही भागांमध्ये समुद्राखाली काही अशा स्थिती निर्माण झाल्या होत्या, ज्यामुळे तिथे कच्च तेल तयार झालं. खासकरून पर्शिअन गल्फमध्ये अशा स्थिती तयार झाल्या होत्या. त्यामुळे तिथे तेलाचे मोठे भांडार आहेत. तेच हिंद महासागराच्या जास्तीत जास्त भागांमध्ये अशी काही स्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे त्यात कच्च्या तेलाचे साठे नाहीत. क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल हे काही खासप्रकारच्या जमिनीखालीच तयार होतं.

जमिनीखाली तेल कुठे तयार होतं?

कच्चं तेल जुन्या समुद्राखाली, सरोवर किंवा नदीच्या तळाशी, गाळ साचलेल्या भागांमध्ये, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोल खडकांच्या थरांमध्ये तयार होतं. पण हे सगळीकडे तयार होतं असं नाही.

कसं तयार होतं तेल?

जमिनीखाली तेल तयार होण्याची प्रक्रिया ही फार किचकट आणि वेळ घेणारी असते. प्राचीन काळात समुद्रात राहणारे सूक्ष्म जीव आणि वनस्पती मरून तळाशी साचतात. कालांतराने त्यावर माती, वाळू आणि इतर गाळाचे थर साचतात. त्यामुळे हे अवशेष खोल दाबले जातात. जमिनीखाली खोलवर गेल्यावर तापमान आणि दाब खूप वाढतो. या उच्च दाब आणि उष्णतेमुळे त्या सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर हळूहळू कच्च्या तेलात आणि नैसर्गिक वायूमध्ये होते. हे तेल छिद्र असलेल्या खडकांमध्ये साठतं आणि वरच्या घट्ट खडकांच्या थरामुळे अडकून राहते.

होर्मुज रस्ता इतका महत्वाचा का?

होर्मुज सामुद्रधुनी म्हणजे जलमार्ग हा इराण आणि ओमान यांच्या मधोमध असलेला एक निमुळता समुद्री मार्ग आहे. या मार्गातून जगातील साधारण २० टक्के तेलाचा सप्लाय होतो. नॅचरल गॅसचा देखील सप्लाय इथूनच होतो. भारत, चीन, जपान आणि अनेक यूरोपिअन देश याच मार्गावर अवलंबून आहेत. जर हा मार्ग बंद पडला तर तेलाचा पुरवठा थांबणार आणि तेलाच्या किंमती गगनाला भिडणार.

भारतात तेल साठे नाहीत असं नाही. पण तेलाचं उत्पादन फार कमी प्रमाणात आहे आणि मागणी फार जास्त आहे. त्यामुळे भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. तेलाचा एक मोठा भाग आधी पश्चिम आशियातून येत होता. पण आता रशिया, अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या देशांकडून तेल घेतलं जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why India Doesn't Extract Crude Oil From Its Seas: Explained

Web Summary : Global crude oil crisis deepens due to Middle East tensions. India heavily relies on imports. Geological conditions limit Indian ocean oil extraction. Oil forms under specific conditions, not universally present. Hormuz Strait's importance highlighted.
टॅग्स :Crude Oilखनिज तेलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके