शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यांचा सगळ्यात महागडा अवयव कोणता? ब्लॅक मार्केटमध्ये लावली जाते वाट्टेल ती बोली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:03 IST

Human Body Parts Price : काही अवयवांच्या किंमती बाजारात सगळ्यात जास्त झाल्या आहेत. अशात सगळ्यात महाग अवयव कोणता आणि इतकी किंमत का दिली जाते हे पाहुयात.

Human Body Parts Price : मानवी शरीरातील सगळेच अवयव महत्वाचे असतात. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. एक जरी अवयव बिघडला तर याचा पूर्ण शरीरावर प्रभाव दिसायला लागतो. मानवी अवयवांच्या विक्रीवर कायदेशीरपणे बंदी आहे. पण तरी सुद्धा जगभरात मानवी अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. अवयवांची लाखो - कोट्यावधी रूपयांना तस्करी केली जाते. अमेरिकेच्या २०२५ मधील डेटानुसार, काही अवयवांच्या किंमती बाजारात सगळ्यात जास्त झाल्या आहेत. अशात सगळ्यात महाग अवयव कोणता आणि इतकी किंमत का दिली  जाते हे पाहुयात.

कोणते अवयव सगळ्यात महाग?

मिलिमॅन रिपोर्टनुसार, अमेरिकेत सगळ्यात महागडं ट्रान्सप्लान्ट डबल लंग्सचं आहे. याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे सर्जरी, हॉस्पिटलचं भाडं, औषधे आणि सर्जरीनंतरची काळजी याचा सरासरी खर्च साधारण २३ लाख ४६ हजार ५०० डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार जवळपास २.३४ कोटी रूपये इतका येतो. दुसऱ्या नंबरवर हार्ट ट्रान्सप्लान्ट आहे, ज्यासाठी १९,१८,७०० डॉलर म्हणजे १.९१ कोटी रूपये मोजावे लागतात. सिंगल लंग्ससाठी १८,१०,७०० डॉलर, इंटेस्टाइनसाठी १७,२९,५०० डॉलर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी १२,६१,८०० डॉलर मोजावे लागतात. तर लिव्हर ट्रान्सप्लांट १०,१७,८०० डॉलर म्हणजे साधारण १ कोटी रूपयात केलं जातं. ही किंमती फक्त कायदेशीर मेडिकल ट्रान्सप्लांटच्या आहेत. 

लंग्स सगळ्यात महाग

डबल लंग ट्रान्सप्लांट सगळ्यात महाग आहे कारण ही सर्जरी फार किचकट असते. फुप्फुसं बदलणं, शरीरात फीट करणं आणि रिजेक्शनचा धोका कमी करणं हे सगळं फार किचकट असतं. हार्ट ट्रान्सप्लांटही काही सोपं नसतं. रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी हा खर्च गरजेचा असतो. पण सामान्य लोकांना हा परवडणारा नसतो. पण सगळ्यात जास्त धक्का तर ब्लॅक मार्केटच्या किंमती ऐकून बसतो. बंदी असूनही जगभरात ऑर्गन ट्रॅफिकिंगचा व्यवसाय ८४ कोटी ते १.७ अब्ज डॉलर इतका वर्षाला असतो. जास्तीत जास्त केसेसमध्ये किडनी सगळ्यात जास्त विकली जाते. ब्लॅक मार्केटमध्ये खरेदीदार ५० हजार ते १,२०,००० डॉलर इतकी किंमत चुकवतात. पण विक्रेत्याला केवळ ५ ते १० टक्केच मिळतात. बाकी ब्रोकर आणि माफिया खातात. लिव्हर, हार्ट आणि लंग्स स्मगलिंगच्या माध्यमातून विकले जातात. गरीब देशांमध्ये नोकरी किंवा पैशाचं आमिष देऊन अवयव काढले जातात. काही वेळा जबरदस्तीनेही अवयव काढले जातात.

वेगाने वाढतेय तस्करी

भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीनसारख्या देशांमध्ये हा धंदा खूप फोफावतोय. 'किडनी व्हॅली'सारखे भाग खूप प्रसिद्ध आहे, जिथे लोक आपली किडनी विकून गरजा पूर्ण करतात. ब्रोकर श्रीमंत रूग्णांना संपर्क करतात. ऑपरेशन नेहमी बेकायदेशीर क्लीनिकमध्ये केले जातात. सर्जरीनंतर जर डोनर आजारी पडला, तर ब्रोकर गायब होतो. पण इन्फेक्शन, रिजेक्शन आणि अटक होण्याचा धोका नेहमीच राहतो. 

वैश्विक आकडेवारीनुसार, दरवर्षी साधारण १२ हजार बेकायदेशीर ट्रान्सप्लांट होतात, जे एकूण ट्रान्सप्लांटच्या १० टक्के आहे. पण खरी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. कारण बऱ्याच केसेस दाबल्या जातात. अनेक देशांनी कठोर कायदे केले आहेत. पण भ्रष्टाचार आणि गरीबीमुळे या केसेस थांबत नाही. अमेरिकेत कायदेशीर ट्रान्सप्लांटची वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. हजारो रूग्ण अवयव मिळत नसल्याने जीव गमावतात. हीच कमतरता ब्लॅक मार्केट भरून काढतं. श्रीमंत लोक परदेशात जाऊन किंवा ब्रोकरच्या माध्यमातून  अवयव खरेदी करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Most Expensive Human Organ: Black Market's Shocking Bids Revealed

Web Summary : Human organs are illegally trafficked globally. Lungs are the priciest due to complex transplants, costing millions. Black market thrives in poorer nations, exploiting vulnerable donors. Kidney sales are rampant, with brokers profiting immensely. Organ trafficking persists despite laws due to corruption and poverty.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके