भारतातील 'या' राज्यातून सगळ्यात जास्त परदेशात जातात लोक, पंजाब तर वाटत असेल तर चुकताय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:04 IST2026-05-19T12:01:44+5:302026-05-19T12:04:30+5:30
Interesting Facts : कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, भारतातील कोणत्या राज्यातून सगळ्यात जास्त लोक परदेशात जातात किंवा परदेशात जाण्यासाठी अर्ज करतात? हेच आपण जाणून घेणार आहोत.

भारतातील 'या' राज्यातून सगळ्यात जास्त परदेशात जातात लोक, पंजाब तर वाटत असेल तर चुकताय...
Interesting Facts : पूर्वीपेक्षा हल्ली भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. लोक फिरण्यासाठी, नोकरीसाठी, बिझनेससाठी, कार्यक्रमांसाठी परदेशात जातात. सोप्या झालेल्या विमान सेवेचा हा प्रभाव मानला जातो. बरेच भारतीय जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. क्वचितच असा कोणता देश असेल जिथे भारतीय नाहीत. अशात कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, भारतातील कोणत्या राज्यातून सगळ्यात जास्त लोक परदेशात जातात किंवा परदेशात जाण्यासाठी अर्ज करतात? हेच आपण जाणून घेणार आहोत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशवाऱ्या कमी करण्याचा सल्ला नागरिकांना दिला. त्यामुळे ही चर्चा अधिक रंगली.
भारतातील असं कोणतं राज्य आहे जिथून सगळ्यात जास्त लोक परदेशात जाण्यासाठी अर्ज करतात? असा प्रश्न जेव्हा समोर येईल तेव्हा जास्तीत जास्त लोक पंजाब हेच उत्तर देतील. पंजाबी लोकच जास्त भारताबाहेर जातात असं सगळ्यांनाच वाटतं. असं वाटणं सहाजिकही आहे. पण हे उत्तर चुकीचं आहे.
प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर राज शमानी याच्या एका शोमध्ये याबाबत चर्चा झाली. ज्यात कोणत्या राज्यातून सगळ्यात जास्त लोक परदेशात जातात हे सांगण्यात आलंय. शमानीच्या शोमध्ये आलेल्या एका गेस्टला त्याने हाच प्रश्न विचारला. बरं राज यानेच पंजाब असं उत्तरही दिलं. पण गेस्टने लगेच हे उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. पंजाब या यादीत पहिल्या नंबरवर येत नाही. ते म्हणाले की, पंजाब नाही तर भारतातील एक दुसरं राज्य आहे जिथून लोक परदेशात जाण्यासाठी सगळ्यात जास्त अर्ज करतात.
कोणतं राज्य पुढे?
गेस्टने सांगितलं की, भारतातील ते राज्य म्हणजे तेलंगणा आहे. यातही हैद्राबादहून सगळ्यात जास्त लोक परदेशात जातात. ते म्हणाले की. आधी पंजाब याबाबतीत पहिल्या नंबरवर होता. पण या दाव्याची पुष्टी आम्ही करत नाही.
याबाबत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलंय की, केरळ मधील लोक मोठ्या संख्येने गल्फ देशांमध्ये नोकरीसाठी जातात. दुबई, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि कुवेतमध्ये केरळमधील भारतीयांची संख्या खूप मोठी आहे.
परदेशात जाणाऱ्या लोकांच्या प्रमाणात ही राज्यंही पुढे आहेत:
गुजरात
आंध्र प्रदेश
तेलंगणा
तमिळनाडू
भारताच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तर जवळपास प्रत्येक कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असल्याचं चित्र दिसून येतं.