पांढरा, निळा की पिवळा...सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? आपल्यालाही माहीत नसेल नेमका रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:25 IST2026-01-16T13:19:58+5:302026-01-16T13:25:46+5:30

Snake Vemon Colour : सापांचं विष देखील काही वेळा चर्चेत राहतं. पण त्याच्या रंगाबाबत फारसं काही बोललं जात नाही. मुळात अनेकांना हे माहीत नसतं की, सापाच्या विषाचा रंग कसा असतो? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

what is the real colour of snake venom? you should know the exact color | पांढरा, निळा की पिवळा...सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? आपल्यालाही माहीत नसेल नेमका रंग

पांढरा, निळा की पिवळा...सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? आपल्यालाही माहीत नसेल नेमका रंग

Snake Vemon Color : भारतात सापांबाबत लोकांच्या मनात वेगवेगळे भ्रम, गैरसमज असतात. ज्यामुळे सापांना मोठ्या प्रमाणात मारलं सुद्धा जातं. सापांच्या वेगवेगळ्या गोष्टींची काहीना काही कारणांनी चर्चाही सुरू असते. अनेक कथांवर विश्वास ठेवून लोक सापांची पूजाही करतात. सापांचं विष देखील काही वेळा चर्चेत राहतं. पण त्याच्या रंगाबाबत फारसं काही बोललं जात नाही. मुळात अनेकांना हे माहीत नसतं की, सापाच्या विषाचा रंग कसा असतो? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

साप एक असा जीव आहे ज्याच्याबाबत लोकांच्या मनात खूप भीती असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, सापाला आपल्यापेक्षा जास्त भीती वाटत असते. ते नेहमीच धोक्याची चाहूल लागताच लपण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण लोक त्यांचा जीव घेतात. जोपर्यंत तुम्ही त्यांची छेड काढत नाही तोपर्यंत साप तुम्हाला काहीही करणार नाही.

कसा असतो सापांच्या विषाचा रंग?

सापाच्या विषाबाबत सांगायचं तर बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, सापाचं विष हे निळ्या रंगाचं असतं. कारण व्यक्तीच्या शरीरावर सापानं जिथे दंश मारलेला असतो ती त्वचा निळसर किंवा काळी पडते. म्हणून मग याचा अर्थ असा अजिबात होत नाही की, सापांच्या विषाचा रंग निळा असतो. जास्तीत जास्त सापांच्या विषाचा रंग पारदर्शी किंवा हलका पिवळा असतो. विषारी प्रोटीन, एंझाइम्स आणि इतर तत्व शरीरातील पेशींचं नुकसान करतात. ज्यामुळे सूज, वेदना आणि रंगात बदल होतो.

सापाच्या विषाचा रंग ठीकपणे तेव्हाच दिसतो जेव्हा ते काचेच्या बरणीत किंवा भांड्यात टाकला जातो. केवळ सापाला बघून किंवा इतर मार्गानं त्याच्या विषाचा रंग सांगता येणं अवघड आहे. जास्तीत जास्त सापांच्या विषाचा रंग पिवळा किंवा हलका पिवळा असतो. काही साप असेही असतात ज्यांच्या विषाचा रंग पांढरा तर काही सापांच्या विषाचा रंग हलका हिरवा असतो. वैज्ञानिकांनुसार सापांच्या विषाचा रंग या गोष्टीवर अवलंबून असतो की, त्यात एल-अमीनो अॅसिड ऑक्सीडेजचं प्रमाण किती आहे. हे एक खासप्रकारचं एंझाइम आहे जे विषाच्या रंगाला प्रभावित करतं.

साप मनुष्यांचा पाठलाग करतात का?

एक्‍सपर्ट सांगतात की, जर साप नेहमी बचावाच्या आणि पळून जाण्याच्या भूमिकेत असतात तर ते तुमचा पाठलाग कसा करतील? त्यामुळे सापांपासून बचाव करण्यासाठी S पॅटर्नमध्ये धावण्याचा दावा एक गैरसमज आहे. साप वेगाने दिशा बदलू शकतात आणि सहजपणे S पॅटर्न असलेल्या रस्त्यावर सरपटू शकतात. तुम्हाला जर सापापासून वाचायचं असेल तर सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे सापांपासून दूर रहा. त्याला डिवचण्याचे कोणतेही प्रयत्न करू नका. तुम्ही पळाले तर सापही तुमच्यावर हल्ला करू शकतो.

Web Title : सांप के विष का रंग: मिथकों का खंडन, असली रंग का खुलासा

Web Summary : सांप का विष हमेशा नीला नहीं होता! यह आमतौर पर पारदर्शी या हल्का पीला होता है, जो एंजाइम से प्रभावित होता है। सांप के व्यवहार, जैसे कि इंसानों का पीछा करना, के बारे में मिथक भी असत्य हैं। सांपों को उकसाने से बचें; शांति से पीछे हटें।

Web Title : Snake Venom Color: Debunking Myths and Revealing the True Hues

Web Summary : Snake venom isn't always blue! It's usually transparent or pale yellow, influenced by enzymes. Myths about snake behavior, like chasing humans, are also untrue. Avoid provoking snakes; retreat calmly.