'हमजा' नावाचा अर्थ काय होतो? धुरंधर पाहिला असेलच पण या नावाचा अर्थ माहीत नसेल, आता जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:07 IST2026-03-21T13:06:39+5:302026-03-21T13:07:10+5:30

Amazing Facts : अनेक जण “हमजा” या नावाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला माहित आहे का हमजा या नावाचा अर्थ काय असतो? नसल्यास आज आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया.

What is the meaning of the name 'Hamza'? You must have seen Dhurandhar but don't know the meaning of this name | 'हमजा' नावाचा अर्थ काय होतो? धुरंधर पाहिला असेलच पण या नावाचा अर्थ माहीत नसेल, आता जाणून घ्या...

'हमजा' नावाचा अर्थ काय होतो? धुरंधर पाहिला असेलच पण या नावाचा अर्थ माहीत नसेल, आता जाणून घ्या...

Amazing Facts : Dhurandhar The Revenge या सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. काही लोक सिनेमाबाबत चांगलं बोलत आहेत, तर काही लोक सिनेमावर टीका करत आहेत. सिनेमातील हमजा अली मजारी या भूमिकेचं देखील भरपूर कौतुक होत आहे. जी रणवीर सिंग याने साकारली आहे. जेव्हा पडद्यावर हमजा अली मजारीच्या भूमिकेत Ranveer Singh दिसतो, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा गडगडाट ऐकू येतो.

एका बाजूला लोक सिनेमाची तिकिटे बुक करण्यात व्यस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनेक जण “हमजा” या नावाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला माहित आहे का हमजा या नावाचा अर्थ काय असतो? नसल्यास आज आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया.

सोशल मीडियावर 'हमजा' नाव ट्रेंड का होत आहे?

तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा एक्स स्क्रोल करत असाल तर तुम्हाला “हमजा” हे नाव खूप ट्रेंड होताना दिसेल. यामागचे मुख्य कारण म्हणजे Dhurandhar The Revenge या चित्रपटात Ranveer Singh यांनी साकारलेली दमदार भूमिका. या सिनेमातील हमजा हे पात्र प्रेक्षकांना इतके आवडले आहे की लोक वारंवार त्या सीनकडे परत जाऊन पाहत आहेत ज्यात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसतो.

हमजा नावाचा अर्थ

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका पोस्टमध्ये सांगितले गेले की “हमजा” हा अरबी भाषेतील शब्द आहे. या नावाचा अर्थ “सिंह” किंवा “शक्तिशाली व्यक्ती” असा होतो. हे नाव धैर्य, ताकद आणि निडरपणाचे प्रतीक मानले जाते. इस्लामच्या इतिहासातही या नावाला विशेष महत्त्व आहे. कारण इस्लामचे पैगंबर मुहंम्मद यांचे काका अमीर हमजा त्यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध होते. त्यांना “असदुल्लाह” (अल्लाहचा सिंह) असेही म्हटले जात असे.

म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही Dhurandhar The Revenge पाहायला गेलात आणि पडद्यावर हमजाची एंट्री झाली, तर लक्षात ठेवा की या नावाचा अर्थ शूर, शक्तिशाली आणि सिंहासारखा निडर व्यक्ती असा आहे.

Web Title : धुरंधर' की चर्चा के बीच 'हमजा' नाम का अर्थ सामने आया।

Web Summary : 'धुरंधर' फिल्म चर्चा में है, रणवीर सिंह का किरदार हमजा लोकप्रियता प्राप्त कर रहा है। 'हमजा,' एक अरबी नाम है जिसका अर्थ 'शेर' या 'शक्तिशाली व्यक्ति' है, जो साहस और शक्ति का प्रतीक है। फिल्म के प्रभाव और ऐतिहासिक महत्व के कारण यह ट्रेंड कर रहा है।

Web Title : Meaning of 'Hamza' revealed amid 'Dhurandhar' movie buzz.

Web Summary : The film 'Dhurandhar' is creating buzz, with Ranveer Singh's character, Hamza, gaining popularity. 'Hamza,' an Arabic name meaning 'lion' or 'powerful person,' symbolizes courage and strength. It's trending due to the film's impact and historical significance.