एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:48 IST2025-06-28T16:47:58+5:302025-06-28T16:48:48+5:30

Airplane Milage : वेगवेगळ्या गाड्यांचे मायलेज तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाचा मायलेज किती असतो?  

What is the fuel mileage of a plane, you should know | एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार...

एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार...

Airplane Milage : टू-व्हिलर घ्यायची असो वा फोर व्हिलर सर्वसामान्य लोक सगळ्यात आधी गाडीच्या फिचरसोबतच मायलेज किती हे बघतात. म्हणजे गाडी १ लीटर पेट्रोलमध्ये किती किलोमीटर धावते हे बघतात. या गोष्टींवरच अनेकांचं गाडी घेणं न घेणं ठरतं. कारण सर्वसामान्याला आधी खिशाचा विचार करावा लागतो. वेगवेगळ्या गाड्यांचे मायलेज तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाचा मायलेज किती असतो?  

बालपणापासूनच प्रत्येकालाच आकाशात उडणाऱ्या विमानाबाबत क्रेझ असते. विमानाचे पंख असोत वा विमानाची चाके प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागलेली असते. तसेही अलिकडे झालेल्या विमानांच्या काही अपघातानंतर तर लोक विमानाबाबत जाणून घेण्यास अधिक उत्सुक असतात. आजकाल बरेच लोक सहजपणे विमानानं प्रवास करतात. पण त्यांनाही कधी विमानाच्या मायलेज प्रश्न पडला नसेल. मात्र, आज आम्ही याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगणार आहोत.

१ मिनिटात किती इंधन खर्च करतं विमान?

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान प्रति सेंकदाला जवळपास ४ लीटर इंधन खर्च करतं. जर बोईंग ७४७ बाबत सांगायचं तर एक किलोमीटरच्या प्रवासादरम्यान हे विमान १२ लीटर इंधन खर्च करतं. एक मिनिटात हे विमान २४० लीटर इंधन खर्च करतं. 

बोईंग विमानाचं गणित

बोईंगच्या वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीनुसार, बोईंग ७४७ विमानात १० तासांच्या उड्डाणादरम्यान ३६ हजार गॅलन म्हणजेच १, ५०, ००० लीटर इंधनाचा वापर होतो. या विमानात प्रति मैल साधारण ५ गॅलन इंधन(१२ लीटर प्रति किलोमीटर) जळतं. एक गॅलन इंधनाचा अर्थ ३.७८ लीटर इतका होतो.

जर बोईंग ७४७ एका किलोमीटरमध्ये १२ लिटर इंधन खर्च करतं, तर याचा अर्थ हा होतो की, हे विमान ५०० प्रवाशांना १२ लीटर इंधनात जवळपास एक किलोमीटर प्रवास करवतं. यानुसार, विमान एक किलोमीटरमध्ये प्रति व्यक्तीवर केवळ ०.०२४ लिटर इंधन खर्च करतं.

रिपोर्टनुसार, बोईंग ७४७ सारखं विमान एक लिटरमध्ये किती चालतं? या प्रश्नाचं उत्तर असेल ०.८ किलोमीटर, हे ऐकायला फारच कमी वाटतं. हे विमान १२ तासांच्या प्रवासादरम्यान १७२, ८०० लीटर इंधन खर्च करतं.

Web Title: What is the fuel mileage of a plane, you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.