काय सांगता? 'या' गावामध्ये होतात सख्या भावाबहिणीचं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 13:22 IST2018-08-24T13:22:30+5:302018-08-24T13:22:39+5:30

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. त्यामध्ये आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी यांसारख्या नात्यांचा समावेश होतो. या प्रत्येक नात्याचं आपल्या आयुष्यात वेगवेगळं स्थान असतं.

weird chhattisgarh tribe tradition where brother sister are forced to marry each other | काय सांगता? 'या' गावामध्ये होतात सख्या भावाबहिणीचं लग्न!

काय सांगता? 'या' गावामध्ये होतात सख्या भावाबहिणीचं लग्न!

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. त्यामध्ये आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी यांसारख्या नात्यांचा समावेश होतो. या प्रत्येक नात्याचं आपल्या आयुष्यात वेगवेगळं स्थान असतं. अनेकदा आत्येभाऊ, आणि मामेभावाशी लग्न लावण्यात येतं. परंतु भारतातील एका गावामध्ये या नात्यांशी तडजोड करण्यात येते. या गावामध्ये भावा-बहिणीच्या नात्यांचं रूपांतर पति-पत्नीमध्ये करण्यात येतं. म्हणजेच एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलीचं आणि मुलाचं आपापसात लग्न लावून देण्यात येतं. 

भारतातील छत्तीसगढ राज्यातील एका आदिवासी पाड्यामध्ये राहणारी  'धुर्वा' नावाची जमात आहे. आदिवासी पाड्यातच राहत असल्यामुळे त्यांचा बाहेरील जगाशी किंवा जगात होणाऱ्या घडामोडींशी कमी संपर्क येतो. तसेच आधुनिक जगापासून किंवा टेक्नॉलॉजीपासूनही हे लोकं दूर आहेत. इतर प्रथा आणि रूढी परंपरांबाबतही त्यांना माहिती नसते. कदाचित यामुळे त्यांच्या परंपरा या इतरांपेक्षा फार वेगळ्या आहेत आणि अद्यापही त्या तशाच सुरू आहेत. 

धुर्वा जमातीत असलेल्या प्रथेनुसार, आई-वडील आपल्या दोन्ही मुलांचं एकमेकांसोबत लग्न लावून देतात. म्हणजेच सख्या भावाचं आणि बहिणीचं आपापसात लग्न लावण्यात येतं. ही प्रथा वर्षानुवर्षांपासून चालत आलेली आहे. 

सख्या भावा बहिणीचं आपापसात लावून देण्यात येणाऱ्या या प्रथेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण जर त्या भावाने किंवा बहिणीने या लग्नास विरोध केला तर त्याला यासाठी मोठी शिक्षा भोगावी लागते.
 
छत्तीसगढच्य़ा आदीवासी जमातीमध्ये असणाऱ्या या प्रथेबाबत अनेकांचं असं मत आहे की, कदाचित या जमातीची लोकसंख्या कमी असल्याने आपल्याच मुलांची एकमेकांसोबत लग्न लावून देतात. पण हे कारण कितपत योग्य आहे हे कोणालाही माहीत नाही.

Web Title: weird chhattisgarh tribe tradition where brother sister are forced to marry each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.