पुष्पक विमानातून नवरी-नवरदेवाची दणक्यात एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:46 IST2018-07-14T15:45:06+5:302018-07-14T15:46:09+5:30
लग्न म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. अनेकजण आपले लग्न लक्षात रहावे यासाठी वेगवेगळ्या हटके कल्पना शोधून काढतात. काही लग्न हटके पत्रिकांमुळे गाजतात.

पुष्पक विमानातून नवरी-नवरदेवाची दणक्यात एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल
लग्न म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. अनेकजण आपले लग्न लक्षात रहावे यासाठी वेगवेगळ्या हटके कल्पना शोधून काढतात. काही लग्न हटके पत्रिकांमुळे गाजतात. तर काही लग्नांमधील नवरदेवाचा किंवा नवरीचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतो. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नामध्ये नवरी-नवरदेवाने घेतलेली एन्ट्री सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काही लग्नांमध्ये नवरी-नवरदेव डान्स करत एन्ट्री करतात, तर काही लग्नांमध्ये नवरदेव घोड्यावरून आणि नवरी डोलीमधून येते. परंतु या लग्नामध्ये नवरी-नवरदेवाने चक्क पुष्पक विमानतून एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे या दोघांची सर्वत्र चर्चा होत आहे.
एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर हॅन्डवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका लग्नाचा असून हे लग्न एका गार्डनमध्ये आहे. तिथेच आकाशात एक जाळीदार गोल आकाराचा स्टॅन्ड दिसत असून त्याला लाईटिंग केली आहे. त्याच्यावर एक मोठ्या आकाराची गरूडाची प्रतिकृती तयार केलेली आहे. त्यामध्येच उभे राहून नवरी-नवरदेवाने दणक्यात एन्ट्री घेतली.
बॅकग्राउंडला 'बहारो फुल बरसोओ मेरा मेहबूब आया है' हे सदाबहार गाणं सुरु आहे. क्रेनच्या सहाय्याने बांधलेल्या पुष्पक विमानातून लग्न असलेल्या गार्डनमध्ये संपूर्ण चक्कर मारून त्यानंतर ते स्टेजजवळ उतरले. दरम्यान हा व्हिडीओ कोणी शूट केला. तसेच कोणाच्या लग्नातील आहे याबाबत कोणतीच माहिती मिळालेली नाही.
It’s a bird, it’s a plane, it’s the groom and bride.
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) July 13, 2018
Indian weddings are getting out of hand. pic.twitter.com/AEWlxw54xD