पाहावं ते नवलंच! दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीचा अनोखा जुगाड,नेटकरीही झाले अवाक्;फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:27 IST2023-11-16T15:23:58+5:302023-11-16T15:27:57+5:30
सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे.

पाहावं ते नवलंच! दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीचा अनोखा जुगाड,नेटकरीही झाले अवाक्;फोटो व्हायरल
Viral Video:सोशल मीडियाला कोणताही विषय वर्ज्य नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेकविध घटना कॅमेऱ्यात कैद करून क्षणार्धात व्हायरल केली जाते. असे भन्नाट फोटो आणि व्हिडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. एका दिवसांत सोशल मीडियावर शेकडो व्हिडिओ, फोटो शेअर केले जात असतात. पैकी काही फोटो किंवा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर असाच एक फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल फोटोमध्ये वाहतूक पोलिसांच्या चलानपासून सुटका होण्यासाठी एका दुचाकीस्वाराने भन्नाट जुगाड केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एका दुचाकीवर दोन जण बसले असून, चालवणाऱ्याने हेल्मेट घातले आहे, तर मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलेलं नाही. मात्र, प्रवासी व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई होऊ नये म्हणून पेपरपासून तयार केलेले कागदी हेल्मेट घातल्याचे दिसून येत आहे. असा भन्नाट जुगाड केलेली एक दुचाकीस्वारांची जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हा फोटो पाहून अनेकांना आपले हसू आवरता येणार नाही.
दुचाकीवर बसलेल्या या व्यक्तीचे काही फोटो आणि व्हिडिओ बनवून काही जणांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांच्या मिश्किल प्रतिक्रिया येत आहेत. या व्हायरल फोटो आणि व्हिडिओला आतापर्यंत तब्बल ३४ हजारांपेक्षा अधिक व्यूज मिळाले आहेत. 'हा व्यक्ती विचित्र आहे वाटतं! 'थंडीपासून बचावाकरिता त्याने असं केलंय का'? अशी गंमतीशीर प्रतिक्रिया देखील एका यूजरने दिली आहे.