शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अविवाहित महिलांचं एक असं गाव जिथे पुरूषांना आहे बंदी, यायचे असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 14:01 IST

या गावात राहणाऱ्या काही महिला विवाहित आहेत. पण त्यांच्या पतीला आणि 18 वयापेक्षा अधिक असलेल्या मुलाला गावात राहण्याची परवानगी नाही.

एसं गाव आहे जिथे केवळ महिलांनाच राहण्याची परवानगी आहे. या गावात राहणाऱ्या काही महिला विवाहित आहेत. पण त्यांचे पती गावाच्या नियमानुसार दुसरीकडे राहतात. या गावाची सगळी व्यवस्था महिलांच्या हातात आहे. कोरोना व्हायरसचा अमेरिकेत आणि यूरोपमध्ये जास्त प्रभाव नव्हता तेव्हा या महिलांनी गाव क्वारंटाइन केलं होतं. गावात कुणालाही येऊ दिलं जात नव्हतं. चला जाणून घेऊ या गावाची खासियत.

या अनोख्या गावात 600 महिलांची घरे आहेत. याची व्यवस्था त्या स्वत: करतात. मीडियात या गावाबाबत जी माहिती त्यानुसार या गावातील महिला फार सुंदर आहेत आणि जास्तीत जास्त महिला अविवाहितच आहेत. ब्राझीलच्या दक्षिण पूर्वेत असलेल्या गावाचं नाव आहे नॉइवा डो कॉर्डिएरो. 

विवाहित महिला कशा राहतात?

या गावात राहणाऱ्या काही महिला विवाहित आहेत. पण त्यांच्या पतीला आणि 18 वयापेक्षा अधिक असलेल्या मुलाला गावात राहण्याची परवानगी नाही. या महिलांचे पती दुसरीकडे राहतात आणि केवळ विकेंडला या गावात येऊ शकतात.

या गावातील महिला शेतीपासून ते घरातील सगळी कामे करतात. मिळून मिसळून राहणाऱ्या महिलांनी इथे एक कम्युनिटी हॉल तयार केलाय. जिथे त्या सर्व एकत्र येऊन टीव्ही बघू शकतात. इथे मोठ्या टीव्हीची व्यवस्था आहे.  

हे गाव तयार कसं झालं यामागे एक कहाणी आहे. 1891 मध्ये मारिया सेन्हॉरिना डी लीमा नावाच्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला गावातून काढण्यात आले होते. तिने या ठिकाणी राहणे सुरू केले होते. तिच्यासोबत सोडल्या गेलेल्या किंवा एकट्या महिलाही राहत होत्या. अशाप्रकारे हे गाव वसत गेलं.

पुरूषांना बंदी कारण...

या गावात पुरूषांचं शासन चालणार नाही, यामागेही एक कहाणी आहे. 1940 मध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरू या गावात आले आणि त्यांनी येथील एका मुलीसोबत लग्न केल्यावर चर्चची स्थापना केली. त्यानंतर त्याने इथे पितृसत्ताक व्यवस्था सुरू करण्यास सुरूवात केली. महिलांवर मद्यसेवन, संगीत ऐकणे, केस कापने आणि गर्भनिरोधक वापरण्यावर बंदी घालू लागला.

पण जेव्हा 1995 मध्ये त्याचं निधन झालं तेव्हा महिलांनी निश्चय केला की, आता त्या गावात पुरूषाचा अधिकार चालू देणार नाही. त्यानंतर महिलांनी फादरने सांगितलेले सगळे नियम मोडले.

कितीही नाही म्हटलं तरी महिलांना पुरूषांची ओढ होतीच. याचाच विचार करून या समुदायातील महिलांनी काही नियम तयार केले. 2014 मध्ये हे गाव जगभरात तेव्हा चर्चेत आलं जेव्हा येथील काही महिलांनी अविवाहित पुरूषांकडून प्रेमाची मागणी केली होती. तेव्हा 23 वर्षीय नेल्माने सोशल मीडियात म्हटले होते की, येथील सुंदर महिला पुरूषांसाठी आतुर आहेत.

नेल्माच्या पोस्टमध्ये लिहिले होते की,  'इथे ज्या पुरूषांना आम्ही मुली भेटतो ते एकतर आमचे नातेवाईत असतात किंवा विवाहित असतात. इथे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. बराच काळ झाला मी एखाद्या पुरूषाला किस केलं नाही. आम्ही मुली प्रेम आणि लग्नासाठी आतुर आहोत. पण आम्ही इथे राहणं सोडू शकत नाही. कारण इथे राहणं आम्हाला आवडतं. पतीसाठी हे गाव सोडता येणार नाही'. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके