बॉटलभर दारू अन् ५० अंडी खाण्याची पैज पडली महागात, ४२ व्या अंड्यानंतर झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 15:05 IST2019-11-04T14:59:26+5:302019-11-04T15:05:34+5:30
अनेकदा पैज लावणं कस कुणाला महागात पडू शकतं, याची अनेक उदाहरणे आपण नेहमीच बघत असतो. अशीच एक जीवघेण्या पैजेची घटना समोर आली आहे.

बॉटलभर दारू अन् ५० अंडी खाण्याची पैज पडली महागात, ४२ व्या अंड्यानंतर झालं असं काही...
(Image Credit : thedailymeal.com)
अनेकदा पैज लावणं कस कुणाला महागात पडू शकतं, याची अनेक उदाहरणे आपण नेहमीच बघत असतो. अशीच एक जीवघेण्या पैजेची घटना समोर आली आहे. पैज लावून दारू प्यायल्याने आणि अंडी खाल्ल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
एका बॉटल दारू पिऊन आणि त्यानंतर तब्बल ४२ अंडी खाऊन या व्यक्तीची अवस्था वाईट झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू असतानाचा त्याने एसजीपीजीआय लखनौमध्ये शेवटचा श्वास घेतला.
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये ही घटना घडली. ४० वर्षीय सुभाष यादव शुक्रवारी सायंकाळी मित्रांसोबत बीबीगंज बाजारात गेला होता. त्यांच्यापैकी एकासोबत सुभाष अंड्याच्या दुकानात गेला. सहज बोलता बोलता दोघांमध्ये पैज लागली. त्यानुसार एक बॉटल दारू आणि ५० अंडी खाल्ल्यावर जिंकणाऱ्याला दोन हजार मिळणार होते.
काय होणार याचा अजिबात विचार न करता सुभाषने पैजेला सुरूवात केली. दारू प्यायल्यानंतर ४२ अंडी खाता-खाता सुभाषची स्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे त्याने पैज हरल्याचं सांगत घराचा रस्ता धरला. तो कसाबसा घरी पोहोचला आणि घरात येताच बेशुद्ध पडला.
परिवारातील लोकांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची स्थिती गंभीर असल्याने दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला. त्याला नंतर लखनौला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इथे उपचारादरम्याने त्याने शेवटचा श्वास घेतला. पैज लावून जीव गेल्याने परिसरात एकच चर्चा झाली. पण पोलिसांनी अजून यावर काहीच कारवाई केलेली नाही.