शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

आजच्या दिवशी रोवली गेली व्हॉटसअॅपची मुहूर्तमेढ; जाणून घ्या रंजक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 5:55 PM

आज व्हॉट्सअॅपचा वाढदिवस.

मुंबई: सध्याच्या घडीला भारतातील स्मार्टफोनधारकांची मुलभूत गरज झालेल्या व्हॉटसअॅपचा आज वाढदिवस आहे. नऊ वर्षांपूर्वी या अॅप्लिकेशनची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर हे अॅप्लिकेशन कमालीचे लोकप्रिय झाले. युजर्सच्या संख्येच्याबाबतीत व्हॉटसअॅपने नवा विक्रम प्रस्थापित केला. आज इतक्या वर्षानंतरही बाजारपेठेत संदेश पाठवणारी विविध अॅप्लिकेशन्स दाखल होऊनही व्हॉटसअॅपने आपली लोकप्रियता कायम राखली आहे. जाणून घेऊयात व्हॉटसअॅपच्या आजपर्यंतच्या रंजक प्रवासाबद्दल.

 

जेन कॉम याने २४ फेब्रुवारी २००९ रोजी व्हॉट्सअॅप INC. या नावाने एक कंपनीची स्थापना केली.

हे जगात सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अॅप्लिकेशन आहे. 

आज प्रत्येक मोबाईलमध्ये दुसरे कोणते अप्लिकेशन असो किंवा नसो पण व्हॉट्सअॅप हमखास बघायला मिळते. 

आज जगभरात १०० कोटींहून अधिक लोक आपल्या दैनंदिन जीवनात व्हॉट्सअॅपचा उपयोग करतात. जगामध्ये भारतात व्हॉटसअॅप युजर्सची संख्या सर्वात जास्त आहे.व्हॉट्सअॅप टीम मध्ये ५५ इंजिनियर काम करतात. यामध्ये एक इंजिनियर १ करोड ८० लाख वापरकर्त्यांना हॅन्डल करतो. व्हॉट्सअॅप वर रोज ४३०० करोड मेसेज पाठवले जातात. व्हॉट्सअॅपवर रोज शेअर होणाऱ्या फोटोची संख्या १६० कोटी एवढी आहे आणि व्हिडिओजची संख्या २५ कोटी एवढी आहे.

व्हॉट्सअॅपचा वापर आपण ५३ भाषांमध्ये केला जातो. व्हॉट्सअॅपचे महिन्याला अॅक्टिव्ह वापरकर्ते १०० कोटी आहेत.व्हॉट्सअॅपवर ग्रुपची संख्या १०० कोटीपेक्षाही अधिक आहे.व्हॉट्सअॅपने स्वतःच्या प्रसिद्धी करिता जाहिरातीवर एक रुपया सुध्दा खर्च केला नाही, तरी ते एवढे लोकप्रिय आहे.

जगात सर्वाधिक डाऊनलोड  होणाऱ्या अॅपपैकी व्हॉट्सअॅप हे ५ व्या नंबरवरील अॅप आहे.व्हॉट्सअॅप “नो अॅड पॉलीसी” वर काम करतो त्यामुळे व्हॉट्सअॅपवर तुम्हाला कुठल्याही कंपनीची जाहिरात दिसत नाही. 

व्हॉट्सअपचा इतिहास. व्हॉट्सअॅपची सुरवात जेन कॉम याने केली. जेन कॉम यांचा जन्म युक्रेन देशातील किंवा या छोट्याश्या गावी झाला. त्यांची आई एक गृहिणी आणि वडील एक मजूर होते. 

जेम कॉम यांना लहानपणापासूनच कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये खूप रस होता. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना कम्प्युटर विकत घेणे परवडत नव्हते. 

१९ व्य वर्षी त्यांनी पैसे जमा करून स्वतः साठी एक कॉम्पुटर विकत घेतला आणि आपल्या घराजवळील लायब्ररीमधून प्रोग्रँमिंगची पुस्तके आणून घरच्या घरी प्रोग्रामिंग शिकू लागले. 

यानंतर त्यांनी कॉम्पुटर सायन्स मधून आपली डिग्री पूर्ण केली आणि एक कंपनी मध्ये सिक्युरिटी टेस्टरच्या पदावर काम करू लागले. 

१९९७ मध्ये याहू या कंपनीत त्यांना इन्फ्रास्ट्रक्ट्चर इंजिनियर या पदावर नोकरी मिळाली. तिथे त्यांची ओळख ब्रायन अक्टन यांच्याशी झाली.

 या दोघांनी ९ वर्ष याहू कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर फेसबुकमध्ये नोकरी करूयात, असे ठरवून नोकरीचा राजीनामा दिला. परंतु फेसबुक मध्ये नोकरीसाठी अर्ज दिल्यानंतर त्यांना तिथे रिजेक्ट करण्यात आले.

 दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची कंपनी सुरु करू असे दोघांनी ठरवले. त्या हिशेबाने दोघांनीही पैसे जमवायला सुरुवात केली.

 त्यावेळी अॅपल कंपनीने त्यांचा पहिला आयफोन बाजारात आणला होता. परंतु त्यावरून मेसेज पाठवणे हे खूप खर्चिक होते. याचवेळी त्यांना व्हॉट्सअॅपची कल्पना सुचली आणि दोघांनी मिळून व्हॉट्सअप हे नवीन मेसेजिंग अँप बनवायला सुरुवात केली. 

सुरुवातीला याहू मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या काही मित्रांनी मिळून कंपनीसाठी अडीच लाख डॉलर्स चा फंड गोळा केला आणि २४ फेब्रुवारी २००९ ला व्हॉट्सअॅप INC. या नावाने एक कंपनीची स्थापना केली.

व्हॉट्सअॅपचा सुरुवातीचा काळ हा खूप कठीण होता . त्यांनी जवळच एक ऑफिस कंपनीसाठी भाड्याने घेतले. तिथे हीटरची व्यवस्था नसल्याने ते आणि त्यांचे सहकारी ऐन थंडीत दिवसातील १६ तास काम करायचे.

 सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअपचे उत्त्पन्न महिन्याला केवळ ५,००० डॉलर्स इतकेच होते. परंतु २०११ जेव्हा त्यांनी अँड्रॉइड मोबाईलसाठी आपले व्हॉट्सअॅप लाँच केले तेव्हा त्यांचे उत्त्पन्न दोन वर्षात २० पटीने वाढले. त्यांचे अप्लिकेशन Play Store मध्ये २० व्या क्रमांकाचे अॅप झाले.

२०१४ मध्ये व्हॉट्सअॅपचा प्रभाव एवढा वाढला की फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजरची लोकप्रियता कमी होते की काय, अशी भीती वाटू लागली. 

यानंतर मार्क झुकेरबर्ग यांनी २०१४ मध्ये जेन कॉम यांच्याशी संपर्क करून व्हॉट्सअॅप विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जेन कॉम यांना मार्क यांचा हा प्रस्ताव आवडला.

 यानंतर मार्क  यांनी १९ अब्ज डॉलर्सला व्हॉट्सअॅप खरेदी केले आणि जेन कॉम आणि ब्रायन अक्टन यांना कंपनीचे शेयर्स देऊ केले. जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सौदा मनाला जातो.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSocial Viralसोशल व्हायरल