शरीरातील एक असा अवयव असतो ज्यात नसतं रक्त, मग त्याचं काम कसं चालतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:08 PM2024-05-02T15:08:31+5:302024-05-02T15:09:01+5:30

शरीरात एक असाही अवयव असतो ज्यात अजिबात रक्त नसतं त्याबाबत आज आपण जाणून घेऊ.

There is an organ in the body that does not have blood, so how does it work? | शरीरातील एक असा अवयव असतो ज्यात नसतं रक्त, मग त्याचं काम कसं चालतं?

शरीरातील एक असा अवयव असतो ज्यात नसतं रक्त, मग त्याचं काम कसं चालतं?

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, मनुष्य रक्ताशिवाय जगू शकत नाहीत. शरीर हे रक्तामुळेच चालतं. शरीराच्या सगळ्याच अवयवांमध्ये रक्त असतं. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, शरीरात एक असाही अवयव असतो ज्यात अजिबात रक्त नसतं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. शरीरात एक असाही अवयव असतो ज्यात अजिबात रक्त नसतं त्याबाबत आज आपण जाणून घेऊ.

आम्ही ज्या अवयवाबाबत तुम्हाला सांगत आहोत तो अवयव म्हणजे कॉर्निया. कॉर्निया डोळ्यांवरील एक थर असतो. हा थर इतका महत्वाचा असतो की, त्याशिवाय व्यक्ती काहीच बघू शकत नाही. कॉर्नियामध्ये कोणतीही एकही रक्तवाहिनी नसते. तर यात नसांचं एक जाळं असतं.

आता कुणालाही हा प्रश्न पडेल की, जर या अवयवामध्ये रक्त नसतं तर मग तो काम कसं करतो? या अवयवाला पोषण कसं मिळतं? तर कॉर्नियाला पोषण देणारं फ्लूइड तिथेच असतं. त्याशिवाय या अवयवाला हवेतून ऑक्सीजनही मिळतं.

कॉर्निया शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. कारण याला जर काही इजा झाली तर व्यक्तीला दिसणं बंद होतं. इतकंच नाही तर कॉर्नियाला गंभीर दुखापत झाली तर व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

Web Title: There is an organ in the body that does not have blood, so how does it work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.