5 तासांपासून तलावात तरंगत होता मृतदेह; माहिती मिळताच पोलीस आले अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:32 IST2024-06-11T16:31:40+5:302024-06-11T16:32:08+5:30

या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

Telangana News : body was floating in lake for 5 hours; police came and... | 5 तासांपासून तलावात तरंगत होता मृतदेह; माहिती मिळताच पोलीस आले अन्....

5 तासांपासून तलावात तरंगत होता मृतदेह; माहिती मिळताच पोलीस आले अन्....

Telangana News : तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. सुमारे 5 तासांपासून तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती रेड्डीपुरम पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले. तो व्यक्ती पाण्यातून बाहेर येताच सर्वांना धक्का बसला. याचे कारण म्हणजे, तो व्यक्ती मेलेला नव्हता. हे पाहून पोलीस आणि स्थानिक लोक चक्रावून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रेड्डीपुरममध्ये भागात मंगळवारी(दि.11) सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह तलावात तरंगत होता. पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज स्थानिकांनी लावला आणि पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र जेव्हा त्या माणसाला पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो माणूस जिवंत असल्याचे पाहून पोलिस आणि गावकरी चक्रावून गेले.

पाच तासांपासून पाण्यात का तरंगत होता, अशी विचारणा केल्यावर त्याने सांगितले की, तो गेल्या 10 दिवसांपासून दररोज ग्रॅनाईटच्या खाणीत कडक उन्हात 12 तास काम करत होता. त्यामुळे शरीर थंड करण्यासाठी पाण्यात पडून होता. हे ऐकून उपस्थित सारेच चकीत झाले.

 

Web Title: Telangana News : body was floating in lake for 5 hours; police came and...