सामान्य कुत्रा म्हणून ज्याला घरी आणलं, त्याची डीएनए टेस्ट केल्यावर समोर आलं वेगळंच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 12:26 PM2019-11-06T12:26:50+5:302019-11-06T12:29:48+5:30

मनुष्यांच्या खऱ्या वंशजाची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केल्याचं तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

Stray dog took a DNA test and it turns out he is endangered Australian dingo | सामान्य कुत्रा म्हणून ज्याला घरी आणलं, त्याची डीएनए टेस्ट केल्यावर समोर आलं वेगळंच...

सामान्य कुत्रा म्हणून ज्याला घरी आणलं, त्याची डीएनए टेस्ट केल्यावर समोर आलं वेगळंच...

googlenewsNext

मनुष्यांच्या खऱ्या वंशजाची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केल्याचं तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. सामान्यपणे एखाद्या जीव-जंतूची उत्पत्ती कुठून झाली हे जाणून घेण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाते. मनुष्यांबाबत ही प्रक्रिया सामान्य बाब आहे. पण तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याची डीएनए टेस्ट केल्याचं ऐकलं किंवा पाहिलंय का? हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण ऑस्ट्रेलियामध्ये असचं काहीसं झालं आहे.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात एका व्यक्तीला त्याच्या बॅकयार्डमध्ये एक कुत्रा सापडला. या कुत्र्याला भटक्या कुत्र्यांपैक एक समजून तो घरी घेऊन आला. पण नंतर कुत्र्यांची डीएनए टेस्ट केल्यावर समजलं की, हा कुत्रा काही साधारण कुत्रा नाहीये.

या कुत्र्याचं नाव आहे वेंडी. यावर्षी ऑगस्टमध्ये हा कुत्रा एका व्यक्तीला सापडला होता. काही दिवसांनी जेव्हा वेंडीची डीएनए टेस्ट केली गेली तेव्हा समोर आले की, वेंडी हा कुत्र्यांच्या एका दुर्मिळ प्रजातीचा कुत्रा आहे. या प्रजातीला ऑस्ट्रेलियात अल्पाइन डिंगो असं म्हटलं जातं. 

ऑस्ट्रेलियन डिंगो ही एक कुत्र्यांची प्रजाती असली तर यांची क्षमता इतर कुत्र्यांपेक्षा फार जास्त असते. ऑस्ट्रेलियामध्ये तीन प्रकारचे डिंगो कुत्रे आढळतात. इनलॅंड डिंगो, ट्रापिकल डिंगो आणि ऑस्ट्रेलियन डिंगो. वेंडी ऑस्ट्रेलियन डिंगो प्रजातीचा कुत्रा आहे. जलवायु परिवर्तनमुळे कुत्र्यांची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

वेंडी हा ऑस्ट्रेलियन डिंगो प्रजातीचा असल्याचं समजताच डिंगो फाउंडेशन सेंच्युरीचे लोक वेंडीला सोबत घेऊन गेले. याच फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या लन वॉटसन यांनी सांगितले की, हा डिंगो कुत्रा त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. सध्या डिंगो फाउंडेशनमध्ये ४० डिंगो कुत्रे आहेत आणि ऑस्ट्रेलियात यांची संख्या वाढवण्यावर काम सुरू आहे. 


Web Title: Stray dog took a DNA test and it turns out he is endangered Australian dingo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.