बायकोने चहा द्यायला केला उशीर, नवऱ्याला आला भयंकर राग, अन् पुढे घडलं भलतंच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:23 IST2023-08-02T15:22:00+5:302023-08-02T15:23:05+5:30
वेळ झाली की अनेकांना चहा हवाच असतो...

बायकोने चहा द्यायला केला उशीर, नवऱ्याला आला भयंकर राग, अन् पुढे घडलं भलतंच...
Husband Wife, Tea: भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. तुम्हाला भारतात प्रत्येत कोपऱ्यात एक ना एक टपरी नक्की सापडेल. काही लोक चहा पिण्यासाठी दूरपर्यंत जातात, तर काही जण असे असतात की ज्यांना दिवसाची सुरुवात चहानेच व्हायला हवी असते. काहीजण चहाचे इतके चाहते असतात की ते दिवसभरात चार-पाच कप चहा पितात. अनेक लोकांसाठी चहा हे जणू व्यसनच असते. चहाप्रेमींची अनेक अकाउंट्सही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या चहाबद्दल माहिती दिली जाते. पण चहाचं प्रेम एखाद्या माणसाच्या आयुष्यात एक विचित्र बदल घडवून आणू शकतो असं म्हटलं तर... पण हे खरं आहे. चहा करायला उशीर केल्याने एका पतीने फार विचित्र गोष्ट केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये समोर आली आहे.
वाचा, घटना नक्की काय?
चहाच्या कारणावरून पतीने पत्नीची चक्क हत्या केल्याची घटना घडली. ग्वाल्हेरच्या युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाची घटना समोर आली आहे. मृत साधना रजक हिचा विवाह मोहित रजक राहत असलेल्या थाटीपूर गावात दोन वर्षांपूर्वी झाला होता. साधना रजक हिच्या लग्नात, ६ महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होते, असे माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे. यामुळे मोहित रजक साधना रजक यांना मारहाण करायचा. इतरांच्या मध्यस्थीने घरात बसून दोघांची समजूत काढली जात असे असे सांगण्यात आले.
अचानक काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी मोहितने साधनाला चहा बनवायला सांगितला. त्यांच्यातील भांडणामुळे साधनाला चहा करायला थोडा वेळ लागला. यासाठी मोहितने साधनाला मारहाण केली. त्याचा राग इतका पराकोटीला गेला की मोहितने थेट तिचा गळा दाबला आणि त्यामुळे साधना यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.