Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:02 PM2021-07-27T14:02:11+5:302021-07-27T14:06:28+5:30

पोलिसांनुसार, गुप्तांगावर गोळी लागलेला जखमी ४५ वर्षीय प्रियकर कोट्टायमच्या वडावथूरच्या एका ४६ वर्षीय व्यक्तीच्या ४० वर्षीय पत्नीसोबत मुंडनकावुमध्ये राहत होता.

Shocking : Kerala husband shot at wife boyfriend private part angry with the affair | Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज

Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज

Next

केरळच्या (Kerala) चेंगन्नुर जिल्ह्यातील मुंडनकावुमद्ये एका व्यक्ती आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगावर गोळी झाडून (Kerala husband shot at wife boyfriend private part) त्याला जखमी केलं. पोलीस म्हणाले की, जखमी व्यक्तीला तिरूवल्ला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यावर पोलिसांना या घटनेबाबत (Kerala Crime News) समजलं. ही घटना शनिवारी घडल्याचा संशय आहे. (Kerala husband shot at wife boyfriend private part angry with the affair)

पोलिसांनुसार, गुप्तांगावर गोळी लागलेला जखमी ४५ वर्षीय प्रियकर कोट्टायमच्या वडावथूरच्या एका ४६ वर्षीय व्यक्तीच्या ४० वर्षीय पत्नीसोबत मुंडनकावुमध्ये राहत होता. दोघांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पण शनिवारी महिलेचा पती मुंडनकावु येथे पोहोचला आणि त्याने पत्नीच्या प्रियकराच्या गुप्तांगावर एअर पिस्तुलने गोळी झाडली. गोळी लागल्यावर काही वेळातच जखमी व्यक्तीला एका खाजगी हॉस्पिटलमद्ये दाखल करण्यात आलं. (हे पण वाचा : एकाच व्यक्तीसोबत आई आणि मुलीचं होतं अफेअर, पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचा तिघांनी खेळ केला खल्लास!)

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, छोटीशी जखम झाल्याने ही व्यक्ती आधी घरी परतली होती पण नंतर गुप्तांगात जोरदार वेदना होत असल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला. तेच पोलीस म्हणाले की, कुणीही तक्रार दिलेली नाही. 

वडिलांनी मुलीवर झाडली गोळी....

दरम्यान, यूपीच्या बदायूंमधील बिल्सीमध्ये तरूणावर प्रेम करणाऱ्या अल्पवयीन मुलीची वडिलांनीच गोळी झाडून हत्या केली. वरिष्ठ पोलीस अधिक्षक संकल्प शर्मा म्हणाले की, ही घटना बिल्सी पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. इथे सोमवारी सकाळी १७ वर्षाच्या एका मुलीची तिच्या वडिलांनी गोळी झाडून हत्या केली.

ही मुलगी गावातीलच एका तरूणावर प्रेम करत होती. यावरून तिचा आणि वडिलांचा वाद झाला होता. रागात वडिलांनी मुलीवर गोळी झाडली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचं गावातील एका तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ती त्याच्यासोबत राहण्याचा हट्ट करत होती. वडिलांना हे अजिबात रूचलं नाही तर त्यांनी गोळी झाडली.
 

Web Title: Shocking : Kerala husband shot at wife boyfriend private part angry with the affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app