एकाच व्यक्तीसोबत आई आणि मुलीचं होतं अफेअर, पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचा तिघांनी खेळ केला खल्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:11 PM2021-07-27T12:11:43+5:302021-07-27T12:25:14+5:30

नवीनकडून मिळालेल्या माहितीनंतर भरत आई आणि बहिणीला मारहाण करत होता. ज्यानंतर आई आणि मुलीने प्रियकर रंजीतसोबत मिळून नवीनची हत्या करण्याचा प्लॅन केला.

जगभरात सध्या गुप्तहेरीवरून गदारोळ सुरू आहे. पण कानपूरमध्ये एका तरूणाला गुप्तहेरी करण्यात आपला जीव गमवावा लागला आहे. हा तरूण एका ओळखीच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून परिसरातील आई आणि मुलीच्या अफेअरबाबत माहिती गोळा करत होता.

गुप्तहेर नवीन त्यांची आणि त्यांच्या प्रियकराची सर्व माहिती त्यांच्या घरातील लोकांना देत होता. या गोष्टीला वैतागून प्रियकराने गुप्तहेर तरूणाची दोन दिवसांपूर्वीच हत्या केली होती. पोलिसांनी प्रियकर आणि आई-मुलीला अटक केली.

कानपूरच्या कोहना पोलीस स्टेशन परिसरातील नवीनचं अपहरण करून हत्येचा खुलासा पोलिसांनी २४ तासात केला. अनैतिक संबंधाची गुप्तहेरी करण्यावरून नवीनची हत्या केली गेली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी रंजीत पाले आणि त्याच्या प्रेयसी असलेल्या आई व मुलीला अटक केली आहे.

याबाबत डीसीपी वेस्ट संजीव त्यागी यांनी सांगितलं की, 'रंजीत पालेचं त्याच्याच परिसरातील भरतची आई आणि बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. हे समजल्यावर भरतने ओळखीच्या नवीन याला याबाबत माहिती मिळवण्यास सांगितलं होतं. नवीन त्यांची सर्व माहिती भरतला देत होता.

नवीनकडून मिळालेल्या माहितीनंतर भरत आई आणि बहिणीला मारहाण करत होता. ज्यानंतर आई आणि मुलीने प्रियकर रंजीतसोबत मिळून नवीनची हत्या करण्याचा प्लॅन केला. तिघांनी मिळून नवीनच्या हत्येचा प्लॅन केला.

यासाठी रंजीतने आधी नवीनसोबत मैत्री केली. नंतर नवीनला तो टेस्कोच्या एका कॉलनीमध्ये घेऊन गेला. इथे विजेच्या ताराने त्याचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशीनंतर आरोपी रंजीतला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केल्यावर संपूर्ण घटना समोर आली.

डीसीपी संजीव त्यागी म्हणाले की, रंजीतचे अनैतिक संबंध भरतची आई आणि बहीण दोघींसोबतही होते. याची संपूर्ण माहिती नवीन भरतला म्हणजे महिलेच्या मुलाला देत होता.

या गोष्टीला वैतागून रंजीतेने नवीनची हत्या केली. यात त्याच्या दोन्ही प्रेयसी महिला आणि तिच्या मुलीने साथ दिली. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक केली गेली आहे.