दरवाजा उघडाच राहिला अन् २८० किमी प्रति तासाच्या वेगाने धावत राहिली बुलेट ट्रेन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 14:40 IST2019-08-23T14:11:06+5:302019-08-23T14:40:30+5:30
बुलेट ट्रेनचं नाव घेताच सर्वातआधी आठवतं ते जपानचं नाव. येथील बुलेट ट्रेन किती वेगाने धावतात हे सर्वांनाच माहीत आहे.

दरवाजा उघडाच राहिला अन् २८० किमी प्रति तासाच्या वेगाने धावत राहिली बुलेट ट्रेन!
बुलेट ट्रेनचं नाव घेताच सर्वातआधी आठवतं ते जपानचं नाव. येथील बुलेट ट्रेन किती वेगाने धावतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण इथे एका बुलेट ट्रेनमध्ये फारच धक्कादायक घटना घडली. असं असलं तरी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. झालं असं की, एक ट्रेन वेगाने धावत होती, पण दरवाजा बंद करणे विसरले. ट्रेन धावतच होती. यावेळी ट्रेन २८० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत होती.
(Image Credit : www.khaleejtimes.com)
इस्ट जपान रेल्वे कंपनीने यावर सांगितले की, हायबुसा नंबर ४६ ट्रेन टनलमध्ये १५ मिनिटांसाठी थांबली होती. कंपनीने सांगितले की, क्लीनर या ट्रेनचा दरवाजा बंद करणे विसरले होते. ज्यानंतरही ट्रेन आपल्या स्पीडने धावत राहिली. या ट्रेनमध्ये दरवाजे मॅन्युअल आहेत. जे बंद करणे क्लीनर विसरले.
(Image Credit : economictimes.indiatimes.com)
ही घटना घडली तेव्हा ट्रेनमध्ये एकूण ३४० प्रवाशी होती. सुदैवाने कुणालाही काही झालं नाही. धक्कादायक बाब म्हणजे दरवाजा उघडा असल्याच्या स्थितीत ट्रेन जवळपास ४ किलोमीटरपर्यंत धावत राहिली.
ट्रेन ऑपरेटरला दरवाजा उघडा असल्याचे कळाले तेव्हा त्याने लगेच आपातकालिन ब्रेक लावला. नंतर दरवाजा बंद केला. या घटनेमुळे ट्रेन १९ मिनिटे उशीराने टोकियोला पोहोचली. असे सांगितले जात आहे की, ट्रेन १९ मिनिटे उशीरा पोहोचल्याने ३ हजार प्रवाशी प्रभावित झाले.