पती-पत्नीला गंमत पडली महागात, प्रेम दाखवण्यासाठी दोघांनीही प्यायलं उंदीर मारायचं औषध आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:26 PM2021-07-08T16:26:12+5:302021-07-08T16:26:54+5:30

गमतीत दोघांनीही कोल्ड ड्रिंकमध्ये उंदीर मारण्याचं औषध प्यायलं. ज्यानंतर दोघांचीही तब्येत नाजूक झाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Punjab : Couple takes poisonous item to prove love for each other, Wife dead husband serious | पती-पत्नीला गंमत पडली महागात, प्रेम दाखवण्यासाठी दोघांनीही प्यायलं उंदीर मारायचं औषध आणि...

पती-पत्नीला गंमत पडली महागात, प्रेम दाखवण्यासाठी दोघांनीही प्यायलं उंदीर मारायचं औषध आणि...

googlenewsNext

कधी पती-पत्नीमधील गंमत त्यांना इतकी महागात पडू शकते का की, दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागेल. अशीच एक घटना समोर आली आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात गमती-गमतीत पती-पत्नीमद्ये हा वाद सुरू झाला की, कोण कुणाच्या सांगण्यावरून काय करू शकतो, काय करू शकतो.

गमतीत दोघांनीही कोल्ड ड्रिंकमध्ये उंदीर मारण्याचं औषध प्यायलं. ज्यानंतर दोघांचीही तब्येत नाजूक झाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे उपचार सुरू असताना महिलेने जीव गमावला तर तिच्या पतीवर आयसीयूमध्ये उपचार  सुरू आहे. डॉक्टरांनुसार पती धोक्यातून बाहेर आहे.

दोघांचंही लग्न ५ वर्षाआधी झालं होतं. दोघांना एक वर्षाची एक मुलगीही आहे. मृत महिलेचं नाव मनप्रीत कौर आहेत तर पतीचं हरजिंदर सिंह. मनप्रीत तर आता या जगात नाही, पण तिच्या पतीवर स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तोही मृत्यूशी झुंज देत आहे. 

हरजिंदरवर उपचार करणाऱ्या ड़ॉक्टरांनी सांगितलं की, सध्या हरजिंदरची स्थिती धोक्यातून बाहेर आहे. त्याला दोन दिवसांसाठी आयसीयू वार्डात शिफ्ट केलं आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी राज सिंह म्हणाले की, दोघांनीही घरी गमती-गमतीत हे जाणून घेण्यासाठी की, पती-पत्नी एकमेकांच्या सांगण्यावरून काय काय करू शकतात. दोघांनीही कोल्ड ड्रिंकमध्ये विषारी द्रव्य टाकून प्यायलं. ज्यामुळे मनप्रीतचा मृत्यू झाला. तर हरजिंदरवर उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Punjab : Couple takes poisonous item to prove love for each other, Wife dead husband serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.