Optical Illusion : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म व्हिडीओ आणि रील्ससोबतच वेगवेगळे फोटो रोज व्हायरल होत असतात. यात फोटोंमध्ये काही खास फोटो असतात. ते म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे त्यात असणाऱ्या गोष्टी सहजपणे दिसत नाही. समोर जे दिसतं ते बघून तुम्ही कन्फ्यूज होता. यातच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मजा येते. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आज आम्ही तुमच्या समोर घेऊ आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींमध्ये तुम्हाला वस्तू किंवा प्राणी, काहींमध्ये फरक किंवा वेगळी अक्षरे शोधायची असतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ड्रायव्हर शोधायचे आहेत. तुमच्या समोर असलेल्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये तुम्हाला बऱ्याच कार वेगवेगळ्या दिशेनं जाताना-येताना दिसत आहेत. त्यात किती ड्रायव्हर आहेत हे शोधणं तुमच्यासाठी चॅलेंज आहे. जे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे ७ सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंमधील गोष्टी शोधताना तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमचं मनोरंजन होतं आणि आयक्यू टेस्टही होते. त्यामुळे तासंतास रील्स बघत बघण्यापेक्षा असे फोटो तुम्ही सॉल्व करू शकता. पण हे काम करणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात तुम्ही फोटोतील ड्रायव्हरची संख्या शोधली असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही तुम्हाला यातील ड्रायव्हर किती हे समजलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ड्रायव्हर सर्कल केलेले बघू शकता.
वरच्या फोटोत ड्रायव्हर सर्कल केले आहेत आणि नंबर दिले आहेत.