शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

मोत्याच्या शेतीने चमकलं नशीब! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता वर्षाला होते ५ लाखांची कमाई, कधी विकत होता पुस्तके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 10:29 IST

नवीन काय करता येईल याचा नरेंद्र  यांनी गुगलवर शोध घेतला. तेव्हा त्यांना मोत्याच्या शेतीबाबत माहिती मिळाली. इतकेच नाही तर मोत्याच्या शेती राजस्थानात फार कमी लोक करतात असेही समजले.

(Image Credit : thebetterindia.com)

ज्या लोकांना वाटतं की, शेतात काम करून काहीही हाती लागत नाही. तर त्यांनी राजस्थानमधील नरेंद्र कुमार गरवा यांना भेटायला पाहिजे. एका सामान्य कुटूंबातील नरेंद्र हे कधीकाळी पुस्तके विकत होते. खूप मेहनत करूनही हवं ते उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नवीन काय करता येईल याचा नरेंद्र  यांनी गुगलवर शोध घेतला. तेव्हा त्यांना मोत्याच्या शेतीबाबत माहिती मिळाली. इतकेच नाही तर मोत्याच्या शेती राजस्थानात फार कमी लोक करतात असेही समजले. अशात त्यांना मोत्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याची सुरूवात घराच्या छतावर केली होती. तेव्हा लोक त्यांना वेड्यात काढत होते. इतकेच काय तर घरातील लोकांनीही त्यांना वेडं म्हणणं सुरू केलं होतं.नरेंद्र यांनी कोण काय म्हणतं याकडे लक्ष दिलं नाही. ते मोत्याची शेती करत राहिले आणि यानेच त्यांचं नशीब बदललं. आज ते ५ लाख रूपयांपर्यंतची कमाई करत आहेत. त्यांनी साधारण चार वर्षांआधी मोत्याची शेती सुरू केली होती. 

(Image Credit : thebetterindia.com)

नरेंद्र यांनी इंडिया टाइम्सला सांगितले की, सुरूवातीला त्यांना हे माहीत नव्हतं हे कसं सुरू करायचं आहे. यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की, ओडिशामध्ये CIFA म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर नावाची एक संस्था आहे. जी शिंपल्याची शेती करण्याचं प्रशिक्षण देते.नरेंद्रला सुरूवातीला त्यांनी वाचलं तेवढंच माहीत होतं. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षण घेणं गरजेचं समजलं. ओडिशातील संस्थेत ते गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी ३० ते ३५ हजार रूपयात शिपल्यातून मोती तयार करण्याला सुरूवात केली. सध्या नरेंद्र ३०० फूटाच्या प्लॉटमध्ये काम करत आहेत.

नरेंद्र यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये छोटे छोटे तलाव तयार केले आहेत. ज्यात त्यांनी मुंबई, गुजरात आणि केरळहून आणलेल्या शिंपल्यांची शेती सुरू केली. चांगल्या शेतीसाठी ते एका जागी साधारण एक हजार शिंपले ठेवतात. यापासून त्यांना दीड वर्षात डिझायनर आणि गोल मोती मिळतात.

(Image Credit : indiatimes.com)

ते म्हणाले की, साधारण २० टक्के शिंपले खराब होतात. पण चांगल्या टेक्निकमुळे त्यांना चांगल्या क्वालिटीचे मोती मिळतात. ज्यातून त्यांची नुकसान भरपाई होते. ते आता छोट्या जागेत काम करत आहेत. तेव्हा वर्षाला ४ ते ५ लाख रूपये कमाई करतात. हेच जर मोठ्या जागेत केलं तर कमाई वाढेल. 

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चरमध्ये एक्सपर्ट म्हणून काम करणारे सौरभ शैलेश यांनी सांगितले की, मोत्याची मागणी मार्केटमध्ये खूप जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, ही शेती देशातील कोणत्याही भागात केली जाऊ शकते. यासाठी केवळ छोटा तलाव आणि गोड पाण्याची गरज असेल. ही वैज्ञानिक शेती आहे. जी सुरू करण्यापूर्वी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे.

हे पण वाचा :

हिरवं सोनं आहे बांबूची शेती, कोट्यधीश झालेत लोक, सरकारही देत आहे सब्सिडी!

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सRajasthanराजस्थान