How to cultivate bamboo and get subsidy by government | हिरवं सोनं आहे बांबूची शेती, कोट्यधीश झालेत लोक, सरकारही देत आहे सब्सिडी!

हिरवं सोनं आहे बांबूची शेती, कोट्यधीश झालेत लोक, सरकारही देत आहे सब्सिडी!

बांबूला हिरवं सोनं मानलं जातं. असंही म्हटलं जातं की, नापीक जमिनीला बांबूची शेती करून सुपीक जमीन केलं जाऊ शकतं. दुसरीकडे बांबूची शेती करून भरपूर उत्पन्नही मिळवलं जाऊ शकतं. अशात आता सरकारनेही बांबू शेती करण्यासाठी ५० टक्के सब्सिडीची घोषणा केली आहे.

indiatimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, उस्मानाबादच्या निपाणी गावातील शेतकरी राज शेखर पाटील यांच एक उदाहरण आहे. त्यांनी ४० हजार बांबूचे रोप आपल्या शेताच्या चारही बाजूने लावले होते. केवळ २ ते ३ वर्षात ४० हजार बांबूपासून १० लाख बांबूचं पिक झालं. हळूहळू लोक हे बांबू खरेदी करण्यासाठी येऊ लागले.

पहिल्या वर्षी त्यांनी १ लाख रूपयांचे बांबू विकले. पुढील दोन वर्षात त्यांना त्याच बांबूमधून २० लाख रूपयांचा फायदा झाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ३० एकर  जमिनीवर चारही बाजूने बांबूची शेती सुरू केली. आता ते ५४ एकर जमिनीचे मालक झाले आहेत. आणि बांबूची शेती करून कोट्यधीश झाले आहेत.

केंद्र सरकार राष्ट्रीय बांबू मिशन योजना घेऊन आली आहे. यातून बेरोजगार तरूणांना आणि शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्यावर ५० टक्के सब्सिडी दिली जाईल. तर छोट्या शेतकऱ्यांना एका झाडावर १२० रूपयांची सब्सिडी दिली जाईल. यादरम्यान बांबूची झाडे वन विभागाकडून दिले जातील.

जुलैमध्ये बांबूच्या रोपांची लागवड केलीज जाते. बांबूचा विकास दोन महिन्यात होतो. बांबूची कटाई त्याच्या उपयोगावर अवलंबून असते. टोपली बनवण्यासाठी बांबूची गरज असेल तर ३ ते ४ वर्ष जुन्या बांबूने काम भागतं. आणि मजबूत कामासाठी हवे असतील तर ६ वर्षे जुने बांबूची गरज पडते. यांची कटाई ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत केली जाते.

हे पण वाचा :

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

Web Title: How to cultivate bamboo and get subsidy by government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.