बोंबला! कोरोना काळात अजब रोमान्स, व्हिडीओ कॉलवर खोकण्याचे अन् शिंकण्याचे ४ लाख घेते मॉडल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:35 IST2021-05-10T16:34:30+5:302021-05-10T16:35:12+5:30
हॉली म्हणाली की, हे खरं आहे की कोरोना काळात हे कल्चर फार वाढत आहे. अनेकदा एखाद्याच्या डिमांडवर खोकणं आणि शिंकण कठिण असतं.

बोंबला! कोरोना काळात अजब रोमान्स, व्हिडीओ कॉलवर खोकण्याचे अन् शिंकण्याचे ४ लाख घेते मॉडल
कोरोना काळात ग्लोबल लॉकडाऊन लागल्यामुळे ओन्ली फॅन्ससारख्या वेबसाइट्सचा बिझनेस चांगलाच वाढला आहे. कारण या साइट्सवर अनेक मॉडल्स आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चांगला पैसा कमावत आहे. असं असलं तरी एका ४२ वर्षीय मॉडलने दावा केला आहे की, तिला क्लाइंट्सच्या अनेक विचित्र डिमांडचा सामना करावा लागतो.
मॉडल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार हॉली मेग्वायरने 'द सन' वेबसाइटसोबत बोलताना सांगितले की, तिला अनेक अशा ऑफर्स येतात ज्यात त्यांना क्लाएंट कॅमेरासमोर खोकण्याची आणि शिंकण्याची डिमांड करतात. अनेकदा १५-२० मिनिटे त्यांना असंच करण्यास सांगितलं जातं. त्यासोबतच क्लाएंटना त्यांना मास्कमध्ये बघणंही आवडतं. (हे पण वाचा : कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार....)
हॉली म्हणाली की, हे खरं आहे की कोरोना काळात हे कल्चर फार वाढत आहे. अनेकदा एखाद्याच्या डिमांडवर खोकणं आणि शिंकण कठिण असतं. अशात मी नेहमी माझ्यासोबत पेपर शेकर ठेवते. ज्याने मला शिंकण्यासाठी मदत मिळते. कोरोना काळात आम्हाला अनेक विचित्र गोष्टी कराव्या लागतात.
हॉली एका वेबसाइटवर फेसटाइम सर्व्हिस देते. ती म्हणाली की, ग्लोबल लॉकडाऊनमुळे स्ट्रिप क्लबसारखी ठिकाणे बंद झाली आहेत. हेच कारण आहे की, ऑनलाइन अनेक वेबसाइटची डिमांड वाढली आहे. लोक यावर म़ॉडल्सचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी पैसे खर्च करतात. (हे पण वाचा : Jewellery jugaad : बाबो! लग्नात मिरवण्यासाठी बाईनं केला कहर; सगळं राहिलं बाजूला अन् मास्कवरच दागिन्यांचा बहर)
हॉलीने सांगितलं की, या ट्रेंडमुळे ती महिन्यातून जवळपास ४ लाख रूपये कमावते. ती म्हणाली की, कोरोना काळात मास्क लोकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. काही लोक तर असेही आहेत जे मास्क स्ट्रिप पसंत करतात. अनेकांनी मला वेगवेगळ्या डिझाइनचे मास्क घालण्याची डिमांड केली.