कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:55 PM2021-05-08T15:55:44+5:302021-05-08T16:19:34+5:30

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अशा काही घटना समोर आल्या आहेत. ज्यात वेगळे झालेले कपल कोरोनाने प्रभावित झाल्यावर पुन्हा सोबत राहण्यासाठी तयार  होत आहेत.

Good effects of coronavirus separated couples reunite after corona makes them know importance of family | कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार....

कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार....

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे चहुकडे अस्वस्थता आहे. रूग्ण उपचारासाठी धडपडत आहेत. आयसोलेशनमधील एकांतवासातून अनेकांना निराशा येत आहे. मात्र, या निराशेमुळे अनेक तुटण्याच्या उंबरठ्यावर असणारी नाती पुन्हा जुळण्याच्या मार्गावर आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अशा काही घटना समोर आल्या आहेत. ज्यात वेगळे झालेले कपल कोरोनाने प्रभावित झाल्यावर पुन्हा सोबत राहण्यासाठी तयार  होत आहेत.

राजधानी भोपाळमध्ये अशात अनेक केसेस समोर आल्या आहेत ज्यात दाम्पत्यांनी पुन्हा सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वाढत्या संक्रमणामुळे कोर्ट बंद आहेत. त्यामुळे त्यांना सांगण्यात आले आहे की, ते सोबत राहू शकतात. यासाठीची कायदेशीर कारवाई नंतर पूर्ण केली जाईल.

मुलाला कोरोना झाल्यावर परिवाराचं महत्व पटलं

साधारण पाच वर्षांआधी लग्नाच्या काही महिन्यांनंतरच एका कपलमध्ये वाद इतका वाढला होता की, त्यांना सोबत राहणं शक्यच होत नव्हतं. रोजच्या भांडणामुळे वैतागून पती-पत्नीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पत्नी माहेरी निघून गेली. इतके पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर आला कोरोना व्हायरस आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा कोरोनाचा शिकार झाला. पत्नीने फोन करून पतीला हे सांगितलं. तर पती हातातील सगळी कामे सोडून मुलाजवळ आला. दोघांच्या प्रयत्नांनंतर मुलगा कोरोना मुक्त झाला. पती-पत्नीला याची जाणीव झाली की, दोघांना एकमेकांची किती गरज आहे. दोघांनी चर्चा केली आणि ते दोघेही सोबत राहण्यास तयार आहेत.

नोकरी गेली तेव्हा पतीने दिला आधार

मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारी मुलीचं आणि एका मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या मुलाचं लग्न तीन वर्षांआधी झालं होतं. तेव्हा त्यांना ड्रीम कपल मानलं जात होतं. पण काही दिवसानंतर हेच नातेवाईक त्यांच्या नात्यातील दरी बनले. मुलीच्या घरातील लोकांच्या हस्तक्षेपामुळे हैराण झालेल्या पतीने तिच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पत्नी नोकरी करत होती. त्यामुळे मुलगा वडिलांसोबत राहत होता. कोरोना काळात पत्नीची नोकरी गेली तेव्हा माहेरच्यांनी कटकट सुरू केली. तेव्हा पत्नीला पतीची आठवण आली. तिने फोन करून मुलाबद्दल विचारले. नात्यात पुन्हा जवळीकता निर्माण झाली. पतीने सांगितले की, चिंता करू नको. मी पैसे पाठवतो. पत्नीलाही तिची चूक समजली. ती आता सासरी परतली आहे आणि संसार आनंदाने सुरू झाला.
 

Web Title: Good effects of coronavirus separated couples reunite after corona makes them know importance of family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.