देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:32 IST2025-09-30T14:31:53+5:302025-09-30T14:32:42+5:30
देवी बनून स्वतःचं साम्राज्य उभ करण्याचं स्वप्न होतं.

फोटो - zeenews
जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो घोटाळ्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. चीनमधील ४७ वर्षीय झीमिन कियान, जी यादी झांग म्हणूनही ओळखली जाते. तिने २०१४ ते २०१७ पर्यंत कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक केली. देवी बनून स्वतःचं साम्राज्य उभ करण्याचं तिचं स्वप्न होतं. झीमिनने तियानजिन लांतियन गेरुई इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजीटेक्नॉलॉजी नावाची कंपनी स्थापन केली.
कंपनीने गुंतवणूकदारांना ३००% पर्यंत परतावा देण्याचं खोटं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात ती गुंतवणूकदारांचे पैसे थेट क्रिप्टोकरन्सीमध्ये, विशेषतः बिटकॉइनमध्ये गुंतवत होती. या योजनेद्वारे तिने अंदाजे १२८,००० लोकांची फसवणूक केली. २०१७ मध्ये, झीमिन चीनमधून पळून गेली आणि युकेमध्ये पोहोचली. २०१८ मध्ये पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला.
डिजिटल वॉलेटमधून ६१,००० बिटकॉइन जप्त केले. त्यावेळी त्यांची किंमत १.४ अब्ज पौंड होती, ती आता ५.५ अब्ज पाऊंड किंवा अंदाजे ६.७ अब्ज पाऊंडपर्यंत पोहोचली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टो जप्ती मानली जाते. अनेक वर्षे फरार राहिल्यानंतर झीमिनला एप्रिल २०२४ मध्ये अटक करण्यात आली. साउथवार्क क्राउन कोर्टात, तिने २०१७ ते २०२४ दरम्यान बेकायदेशीरपणे क्रिप्टोकरन्सी बाळगल्याची आणि हस्तांतरित केल्याची कबुली दिली.
ब्रिटिश पोलिसांना झीमिनची डायरी देखील सापडली, ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की, दलाई लामांनी तिला पुनर्जन्म झालेली देवी म्हणावं अशी तिची इच्छा होती. डॅन्यूब नदीजवळ क्रोएशिया आणि सर्बिया दरम्यान एका जमिनीवर लिबरलँड नावाचं साम्राज्य उभं करायचं होतं. झीमिनचं ५ मिलियन पाऊंड किमतीचा मुकुट आणि राजदंडचं स्वप्न होतं. तिला देवी बनून आपलं साम्राज्य निर्माण करायचं होतं.