पती, पत्नी और वो! ५ मुलं असलेलं कपल पडलं एका महिलेच्या प्रेमात, आता तिघेही एकत्र राहतात आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 15:22 IST2021-02-03T15:19:34+5:302021-02-03T15:22:24+5:30
ही कहाणी आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या जेनिफर आर्मस्टीड(३४) आणि तिचा पती लॅरन आर्मस्टीड(३३)ची.

पती, पत्नी और वो! ५ मुलं असलेलं कपल पडलं एका महिलेच्या प्रेमात, आता तिघेही एकत्र राहतात आणि...
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. पाच मुलांचे आई-वडील असलेलं एक कपल एका महिलेच्या प्रेमात पडलं. या कपलने तिसऱ्या महिलेला नेहमीसाठी त्यांच्या आयुष्यात जागा दिली आहे. आता तिघेही त्यांच्या सहाव्या बाळाची वाट बघत आहेत. ही कहाणी आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या जेनिफर आर्मस्टीड(३४) आणि तिचा पती लॅरन आर्मस्टीड(३३)ची.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेनिफर आणि लॅरन गेल्या १६ वर्षांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. पण आता त्यांच्या आयुष्यात एमिया आली असून ते त्यांच्या सहाव्या बाळाची वाट बघत आहेत. एमिया ५ आठवड्यांची प्रेग्नेंट आहे. पहिल्यांदा फेसबुकवर लॅरनची भेट २९ वर्षीय एमिया मुन्निनघमसोबत झाली होती. लवकरच दोघींमध्ये मैत्री झाली. नंतर लॅरनने एमियाची भेट पत्नी जेनिफरसोबत करून दिली. यानंतर जेनिफर आणि एमिया जवळ आल्या.
कपलने सांगितले की, एमियासोबत भेट होण्यापूर्वी त्यांनी कधीही या गोष्टीचा विचार केला नव्हता की, तिसरी व्यक्ती आयुष्यात येईल. तर दुसरीकडे एमिया याआधीही एका कपलसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली आहे.
कपलने सांगितले की, एमियासोबत पहिली भेट चार महिन्याआधी झाली होती. आता तर तिला त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीसाठी जागा दिली आहे. जेनिफरने सांगितले की, जेव्हा पतीने एमियासोबत भेट करून दिली तेव्हाच दोघींमध्ये एक मैत्रीचं चांगलं नातं निर्माण झालं होतं.
थ्रपल(तीन लोकांचा रोमॅंटिक समूह)ने सांगितले की, तिघे मिळूनही ते एमियाच्या बाळाचं संगोपन करतील. थ्रपल म्हणालं की, त्यांनाही इतर कपलप्रमाणे ईर्ष्या, असुरक्षा आणि वादांचा सामना करावा लागतो. जेनिफरने सांगितले की, खासकरून एमियासोबत रोमॅंटिक रिलेशनशिप ठेवण्यात अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.