Marriage Video: लपवलेल्या बुटांच्या बदल्यात वराने दिले कमी पैसे, मेहुणी भडकली, केलं असं काही की पाहुणे पाहतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 18:48 IST2022-06-05T18:47:47+5:302022-06-05T18:48:40+5:30
Marriage Viral Video: भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये विविध विधी आणि रीतीरिवाज हे समारंभपूर्वक केले जातात. सप्तपदी, वरमाला, वरातीपासून ते बुट लपवण्यापर्यंत विविध रिवाज वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. सध्या लग्नातील बूट लपण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Marriage Video: लपवलेल्या बुटांच्या बदल्यात वराने दिले कमी पैसे, मेहुणी भडकली, केलं असं काही की पाहुणे पाहतच राहिले
नवी दिल्ली - सध्या देशामध्ये लगिनसराईचा हंगाम सुरू आहे. या लग्नसोहळ्यांमधील हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. तर त्यातील काही हटके व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये विविध विधी आणि रीतीरिवाज हे समारंभपूर्वक केले जातात. वऱ्हाडी मंडळी त्याचा आनंद घेत असतात. सप्तपदी, वरमाला, वरातीपासून ते बुट लपवण्यापर्यंत विविध रिवाज वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. सध्या लग्नातील बूट लपण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लग्नसोहळ्यात मेहुणी वराचा बुट लपवते. त्यानंतर त्याच्या बदल्यात गिफ्टची मागणी केली जाते. हा कार्यक्रम खूपच गमतीदार असतो. यामध्ये नवेनवे भाओजी आणि मेहुणीमधील गमतीदार भांडण पाहण्यासारखं असतं. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्येही असंच काहीसं चित्र दिसत आहे. त्यामध्ये लपवलेल्या बुटांच्या मोबदल्यात कमी पैसे मिळतात, त्यामुळे मेहुणी चांगलीच वैतागते.
लग्नामध्ये वर बुट सुरक्षित ठेवत असतो. मात्र त्याच्या मेहुण्या हे बुट चोरून घेऊन जातात. या विवाह सोहळ्यातही असंच काहीसं चित्र दिसलं. मात्र जेव्हा हे लपवलेले बुट परत देण्याची वेळ येत तेव्हा वर मेहुणीला तिला अपेक्षित असलेली रक्कम देत नाही. त्यामुळे ती वैतागते. तुम्ही यात पाहू शकता की, मेहुणी वराकडून मिळालेले पैसे मोजते. मात्र ते कमी असल्याने त्याला परत करते.
त्यानंतर नवानवा भाओजी बनलेला वर आणि त्याच्या मेहुणीमध्ये लुटुपुटूचं भांडण होतं. बुट लपवण्याचा हा कार्यक्रम असलेला व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरला असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शैस्ता खान नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे.