तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!! त्याच्या अंगात सनी संचारला; भरकोर्टात हायव्होल्टेज ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:56 IST2021-07-22T17:55:14+5:302021-07-22T17:56:29+5:30
कडकड्डूमा कोर्ट रूम नंबर ६६ मधील ही घटना आहे. १ जुलै रोजी ही घटना घडली. शास्त्रीनगरमधील राकेश नावाच्या व्यक्तीची या कोर्टात केस सुरू होती.

तारीख पे तारीख! तारीख पे तारीख!! त्याच्या अंगात सनी संचारला; भरकोर्टात हायव्होल्टेज ड्रामा
कोर्टात जेव्हा सुनावणी असते तेव्हा तिथे शांतता आणि शिस्तीबाबत फार जास्त लक्ष दिलं जातं. मात्र, दिल्लीच्या कडकड्डूमा कोर्टात (karkardooma court) असं काही बघायला मिळालं जे याआधी कधी झालं नाही. एका व्यक्तीला त्याच्या केसची पुढची तारीख (Court Date) मिळाली तर तो संतापला. रागाच्या भरात त्याने कॉम्प्युटरला लाथ मारली आणि खुर्च्याही फेकल्या. इतकंच नाही तर त्याने वैतागून मोठ्या आवाजात 'दामिनी' सिनेमातील सनी देओलचा (Sunny Deol dialouge Taarikh pe Taarikh) 'तारीख पे तारीख' डायलॉग म्हटला.
कडकड्डूमा कोर्ट रूम नंबर ६६ मधील ही घटना आहे. १ जुलै रोजी ही घटना घडली. शास्त्रीनगरमधील राकेश नावाच्या व्यक्तीची या कोर्टात केस सुरू होती. ही केस २०१६ पासून सुरू आहे. १७ जुलैल प्रकरणाची सुनावणी होती. राकेश तारखेवर आला होता. प्रकरणाची सुनावणी झाली आणि कोर्टाने पुढील तारीख दिली. यावर राकेश चांगलाच संतापला.
राकेशने भर कोर्टात तावातावाने सनी देओलचा प्रसिद्ध डायलॉग 'तारीख पे तारीख' म्हणत कॉम्प्युटर आणि फर्निचर तोडायला सुरूवात केली. सोबतच म्हणाला की, त्याला इतक्या तारखा मिळत आहेत, पण न्याय काही मिळत नाहीय. यानंतर कोर्टाच्या स्टाफने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी राकेशला अटक केली. पोलिसांनी राकेशला अटक करून मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं. ज्यानंतर त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, राकेश लागोपाठ तारखा मिळत असल्याने निराश झाला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण कोर्टात चर्चेचा विषय ठरलं. सोशल मीडियावरही लोक या घटनेबाबत चर्चा करत आहेत.