याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, लोक म्हणाले- हा तर शुद्ध वेडेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:06 IST2021-08-25T18:29:51+5:302021-08-25T19:06:06+5:30

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या माध्यमावर आपल्या हादरवून सोडणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अतिशय थरारक आहे.

man runs with blasting fireworks, video goes viral on social media | याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, लोक म्हणाले- हा तर शुद्ध वेडेपणा

याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, लोक म्हणाले- हा तर शुद्ध वेडेपणा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या माध्यमावर आपल्या हादरवून सोडणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अतिशय थरारक आहे. 

या व्हिडीओमध्ये लोक मजेत डान्स करताना दिसत आहेत. यावेळी एक माणूस आपल्या हातांमध्ये फटाके घेऊन डान्स करत असलेल्या लोकांकडे धावत जातो. त्याने दोन्ही हात वर केलेले असून त्याच्या हातात फटाके आहेत. तो धावत असताना फटाके वर हवेत जाऊन फुटत आहेत. इतक्यात या माणसाच्या हातातील फटाक्यांचा बॉक्स खाली पडतो आणि मग चांगलीच धांदल उडते. फटाके सर्व बाजूंनी जमिनीवर धडाधड वाजायला सुरुवात होते अन् सगळे आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटतात.

या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी व्हिडीओला पाहून हसू आवरलेले नाही. तर काही लोकांनी असा वेडेपणा करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ insta_desii या इन्स्टाग्राम अकाऊंटर शेअर करण्यात आला आहे.

Web Title: man runs with blasting fireworks, video goes viral on social media