दिराच्या प्रेमात पडली दोन लेकरांची आई असलेली वहिनी, महिलेचा पती निघाला तिच्या एक पाउल पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:06 IST2021-07-29T16:00:01+5:302021-07-29T16:06:13+5:30
झारखंडच्या गिरिडीहमध्ये ही घटना घडली. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं लग्न लहान भावासोबत लावून दिलं. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिराच्या प्रेमात पडली दोन लेकरांची आई असलेली वहिनी, महिलेचा पती निघाला तिच्या एक पाउल पुढे...
देशात रोज विचित्र घटना घडत असतात. कधी दोन लेकरांची आई असलेली महिला भाडेकरू तरूणासोबत पळून जाते तर कधी नव्याने लग्न झालेला तरूण पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवून येतो. अशीच एक अनोखी आणि आश्चर्यकारक घटना झारखंडमधून समोर आली आहे. झारखंडच्या गिरिडीहमध्ये ही घटना घडली. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं लग्न लहान भावासोबत लावून दिलं. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
गिरिडीह जिल्ह्यातील लचकन गावातील ही घटना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर या व्यक्तीची पत्नी दिराच्या प्रेमात पडली होती. ज्यानंतर पतीने हे पाउल उचललं आहे. जेव्हा त्याला पत्नी आणि भावाच्या प्रेमसंबंधाबाबत समजलं तेव्हा त्याने सहमतीने भावाचं लग्न आपल्या पत्नीसोबत लावून दिलं. ही महिला दोन मुलांची आई आहे. (हे पण वाचा : दोन वर्षापूर्वी तरूणावर दाखल केली होती रेप केस, १८ वर्षाची झाल्यावर त्याच्यासोबतच केलं तरूणीने लग्न)
रिपोर्टनुसार, महिला अचानक गुजरातच्या सूरतमध्ये पोहोचली होती. तिथे तिचा पती आणि दीर काम करत होते. पण सूरतमध्ये पती राहतो तिथे जाण्याऐवजी ती दिराच्या घरी गेली. त्यानंतर दोघेही सोबत राहत होते आणि यानंतर दोघांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
जेव्हा पतीला याची माहिती मिळाली तेव्हा तो आपल्या भावाच्या घरी गेला आणि दोघांशी तो बोलला. पतीने भावाची आणि आपल्या पत्नीची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांनीही त्यांना एकत्र रहायचं असल्याचं सांगितलं. तसा त्यांनी निर्णयही घेतला. (हे पण वाचा : पत्नीला सोडून विवाहित महिलेशी अफेअर, प्रेग्नेन्सीच्या गुपिताने पलटला सगळा खेळ...)
यानंतर त्याने स्वत: आपल्या पत्नीचं आणि भावाचं लग्न लावून दिलं. त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. महिलेचा पती म्हणाला की, लग्नानंतर मला समजलं की, माझी पत्नी गावातील नात्याने भाऊ लागत असलेल्या व्यक्तीला पसंत करते. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी दोघांच्या मधे न येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं लग्न लावून दिलं.