दोन वर्षापूर्वी तरूणावर दाखल केली होती रेप केस, १८ वर्षाची झाल्यावर त्याच्यासोबतच केलं तरूणीने लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:33 PM2021-07-28T12:33:28+5:302021-07-28T12:46:22+5:30

वयस्क होईपर्यंत तरूणीने प्रेम विसरलं नाही. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम मिळवण्यासाठी ती वाट बघत राहिली. प्रियकरही बदनामी झाल्यावर तिला भेटण्यासाठी वाट बघत राहिला.

यूपीच्या अलिगढमध्ये प्रेयसी वयस्क झाल्यावर तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रियकरासोबत मंदिरात लग्न केलं. प्रेयसीच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता म्हणून प्रियकरावर अपहरणाचा आणि रेपचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला ५ महिन्यांची शिक्षाही झाली होती.

हायकोर्टातून प्रियकराला जामिन मिळाला होता. पण यादरम्यान दोघे भेटू शकले नव्हते. तेच तरूणी १८ वर्षांची झाल्यावर तिने कोर्टासमोर प्रियकरासोबतची प्रेम कहाणी सांगत त्याच्यावर केस मागे घेतली.

घरातील लोकांच्या विरोधानंतर प्रेयसीने मंगळवारी श्री वार्ष्णेय मंदिरात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे प्रियकरासोबत लग्न केलं. प्रेयसीने सांगितलं की, तिच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तिने मुख्यमंत्री, एसएसपी, महिला आयोगाकडे मदत मागितली आहे.

वयस्क होईपर्यंत तरूणीने प्रेम विसरलं नाही. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम मिळवण्यासाठी ती वाट बघत राहिली. प्रियकरही बदनामी झाल्यावर तिला भेटण्यासाठी वाट बघत राहिला.

तीन वर्षाआधी पंचनगरीची राहणारी खुशी पाठक कोचिंग क्लासमधील वरूणच्या प्रेमात पडली होती. जयगंज येथे राहणारा वरूणही खुशीच्या प्रेमात पडला. पण हे नातं खुशीच्या घरातील लोकांना पसंत नव्हतं. दोघेही घरातून पळून गेले होते. पण खुशीच्या वडिलांनी वरूण विरोधात अपहरण आणि रेपचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दोघांनाही पकडलं आणि वरूणला अपहरण आणि रेपच्या गुन्ह्यातत तुरूंगात जावं लागलं. खुशी काहीच करू शकली नाही. कारण ती अल्पवयीन होती. तेच तिला तिच्या वडिलांनी वरूण सोबत संबंध ठेवले तर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. घरातील लोकांच्या विरोधामुळे खुशी ३ वर्ष गप्प राहिली.

घरच्यांच्या विरोधात जाऊन खुशीने मंदिरात लग्न केलं. यादरम्यान वकील, मंदिराचा पुजारी, वरूणचे वडील अरविंद परिवारासह उपस्थित होते. खुशीच्या घरचे लोक या लग्नात सहभागी झाले नाहीत.

खुशीने सांगितलं की, कोर्टात माझ्या परिवाराने केस कली होती. पण आता १८ वर्ष पूर्ण केल्यावर मी वरूणच्या बचावात जबाब दिला आहे आणि १८ वर्ष पूर्ण झाल्याने माझ्या मर्जीने लग्न करत आहे.