२४ व्या वर्षापर्यंत केली तीन लग्ने, झाली चार मुले, आता ही महिला म्हणते मी तिसऱ्या लग्नावर खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:14 PM2021-10-04T17:14:45+5:302021-10-04T17:15:01+5:30

Jara hatke : एका महिलेने २४ वर्षांच्या वयात तीन वेळा लग्न केले. यादरम्यान तिला चार मुलेही झाली. आता आपण तिसऱ्या लग्नापासून समाधानी आहे, असे या महिलेने म्हटले आहे.

I got married three times till the age of 24, had four children, now this woman says I am happy with my third marriage | २४ व्या वर्षापर्यंत केली तीन लग्ने, झाली चार मुले, आता ही महिला म्हणते मी तिसऱ्या लग्नावर खूश

२४ व्या वर्षापर्यंत केली तीन लग्ने, झाली चार मुले, आता ही महिला म्हणते मी तिसऱ्या लग्नावर खूश

Next

लंडन - एका महिलेने २४ वर्षांच्या वयात तीन वेळा लग्न केले. यादरम्यान तिला चार मुलेही झाली. आता आपण तिसऱ्या लग्नापासून समाधानी आहे, असे या महिलेने म्हटले आहे. सध्या या महिलेची सात मुले आहेत. सोशल मीडियावर या महिलेने आपल्या जीवनाबाबत माहिती दिली आहे. त्यात तिने ती कमी वयामध्ये कशी माता बनली आणि तिला तीन विवाह करावे लागले, याबाबतची माहिती दिली आहे. (I got married three times till the age of 24, had four children, now this woman says I am happy with my third marriage)

डेली स्टारच्या वृत्तानुसार जेस नावाच्या ब्रिटिश महिलेने टिकटॉकच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. ती केवळ १७ वर्षांची असताना ती पहिल्यांदा गर्भवती राहिली. एक वर्षानंतर म्हणजेच १८ व्या वर्षी ती पुन्हा एकदा गर्भवती राहिली. त्यावेळी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. २१ व्या वर्षी जेस तिसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. अशा प्रकारे ती चार मुलांची आई बनली. 

यादरम्यान, जेसचे दोन विवाह झाले. मात्र हे दोन्ही विवाह एकाच व्यक्तीशी झाले. जेस सांगते की, मी आपल्या पहिल्या पतीशी १९ व्या वर्षी लग्न केले. मी गर्भवती असताना त्याने मला फसवले. मात्र आम्हाला जुळी मुले झाल्यानंतर आमच्यात तडजोड होऊन पुन्हा एकत्र आलो. त्याने माझ्याशी पुन्हा लग्न केले. जेस सांगते की, जेव्हा मी चौथ्यांदा गर्भवती राहिले तेव्हा त्याने मला सोडले. त्यामुळे मला चार मुलांसह एकट्याने राहणे भाग पडले. मात्र काही काळानंतर माझ्या जीवनात एक अजून व्यक्ती आली.

या महिलेने पुढे सांगितले की, चार मुलांसह सिंगल मदर झाल्यानंतर मी एका व्यक्तीला भेटले. त्यानंतर त्याने माझ्याशी विवाह केला. आमच्या लग्नाला आता सहा वर्षे झाली आहेत. आता आमची एकूण सात मुले आहेत. आज जेसचे वय २९ वर्षे आहे. तसेच ती तिसऱ्या लग्नावर खूश आहे. रिपोर्टनुसार टिकटॉकवर जेसचे १.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज आहेत.    

Web Title: I got married three times till the age of 24, had four children, now this woman says I am happy with my third marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.