पतीने सगळ्यांसमोर पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लावलं लग्न, दोन मुलांना एकटा सांभाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 10:18 IST2023-11-18T10:18:11+5:302023-11-18T10:18:30+5:30

दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. बरीच वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं. पण काही काळाने हे नातं कमजोर होऊ लागलं.

Husband got his wife married to her lover deoghar Jharkhand | पतीने सगळ्यांसमोर पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लावलं लग्न, दोन मुलांना एकटा सांभाळणार

पतीने सगळ्यांसमोर पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लावलं लग्न, दोन मुलांना एकटा सांभाळणार

झारखंडच्या देवघरमधून लग्नाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. असं सांगण्यात आलं की, पुरंदहा इथे राहणाऱ्या शुभंकर रवानीचं लग्न मीना देवीसोबत 12 वर्षाआधी झालं होतं. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. बरीच वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं. पण काही काळाने हे नातं कमजोर होऊ लागलं.

यादरम्यान मीना देवीचं अफेअर करो गावातील सिकंदर कुमार यादव याच्यासोबत सुरू झालं. दोघांना एकमेकांवर प्रेम झालं. मीना देवी दिवाळीच्या दिवशी पतीसोबत भांडण करून प्रियकर सिकंदरकडे गेली. मग दोघेही शुभंकर रवानीकडे आले आणि त्यांना लग्न करणार असल्याचं सांगू लागले. यानंतर चांगलाच गोंधळ झाला. परिवारांसोबतच स्थानिक लोकांनी ठरवलं की, मीना आणि सिकंदरचं लग्न लावण्यात यावं. 

शुभंकर रवानीने स्वत: आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून  दिलं. लोकांसमोर तिच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं. लग्न झाल्यावर अनेक कागदपत्रांवर तिच्या सह्याही घेण्यात आल्या. जेणेकरून समोर जाऊन शुभंकर रवानी याला काही समस्या होऊ नये. 

आता पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्यात आल्यानंतर शुभंकरने ठरवलं आहे की, तो आपल्या मुलांची देखरेख एकटा करेल. सध्या या अनोख्या लग्नाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. 

Web Title: Husband got his wife married to her lover deoghar Jharkhand